Coronavirus : ‘कोरोना’च्या लढाईत विदेशातून परतल्यानंतर ‘गायब’ झालेल्या 339 लोकांचं मोठं ‘आव्हान’, तपास यंत्रणेला ‘घाम’च फुटला

चंदीगढ : वृत्तसंस्था – हरियाणामध्ये कोरोना विरुद्धच्या लढाईत विदेश प्रवासानंतर गायब झालेले लोक आव्हान बनले आहेत. हरियाणा मध्ये परदेशातून आलेले ३३९ लोक क्वारंटाइन होण्याच्या भीतीमुळे गायब आहेत, काही जण पासपोर्टमध्ये नाव आणि पत्ता चुकीचा असल्यामुळे सापडत नाहीयेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक गायब झाल्याने प्रदेशातील गुप्त संघटना त्रस्त आहेत.

काही क्वारंटाइन व्हायच्या अगोदरच गायब, तर काही क्वारंटाइन दरम्यान पळाले
सरकारला शंका आहे की, हे लोक लपून किंवा इतर राज्यात पळून जाऊन कोरोना संसर्ग पसरवू शकतात. प्रदशचे गृहमंत्री अनिल विज यांनी सर्व जिल्हा पोलिस अधीक्षकांना अशा गायब झालेल्या विदेशी यात्रींना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांच्याद्वारे घेतलेल्या चार मोठ्या विभागांच्या आढावा बैठकीत देखील विदेशी यात्रेनंतर गायब झालेल्या यात्रींबाबत चर्चा झाली. पहिले शंका होती कि जवळजवळ २०० लोक असे होते, जे गायब आहेत, पण प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर ३३९ संख्या समोर आली. मुख्यतः सात जिल्ह्यांतून हे लोक गायब झाले आहेत. सर्वात जास्त १८५ लोक पानिपत जिल्ह्यातून गायब आहेत. सरकारने आदेश दिले आहेत कि एसपीसोबत डीसी देखील सहकार्य करेल.

अनेक लोकांच्या चुकीच्या पत्त्यावर मिळाले पासपोर्ट, काही अगोदरच परत परदेशात गेले
हरियाणा पोलिसांच्या अहवालानुसार, ४ एप्रिल पर्यंत हरियाणा मध्ये एकूण ८०३४ लोक परदेशातून आले. यातील ७६९५ लोकांना होम क्वारंटाइन केले गेले. यातील बरेच लोक असे आहेत, जे आपआपल्या स्तरावरच होम क्वारंटाइन झाले, तर ५९३७ जणांना पोलिस किंवा आरोग्य विभागाच्या हस्तक्षेपानंतर होम क्वारंटाइन करावे लागले. सध्या ३३९ लोक असे आहेत ज्यांच्याबाबत पोलिसांकडे कोणतेही पुरावे नाहीयेत.

हरियाणा पोलिसांनी अनेकदा अशा लोकांचा तपास केला असून आता प्रदेश सरकारकडून हे प्रकरण केंद्राला रेफर केले जात आहे. हरियाणामध्ये जेव्हापासून कोरोना पसरला तेव्हापासून तबलिगी जमात आणि परदेशी नागरिक प्रदेश सरकारसाठी एक अडचण झाले आहेत. पंजाब मध्येही जवळजवळ ६५ हजार एनआरआय आहेत, जे हरियाणात आल्याची शंका सरकारला आहे. सरकारने सगळ्या सीमा बंद केल्या आहेत, पण सरकारची चिंता मात्र वाढली आहे.

या लोकांचा पोलीस करत आहेत तपास
जिल्हा परदेशातून आलेले गायब झालेले
रेवाडी १६९ १
फरीदाबाद ८०६ ९
यमुनानगर १२८० १२
पंचकुला ४०९ ३३
पानिपत २५५७ १८५
भिवानी ४७१ ८४
कुरुक्षेत्र २३३३ १५
——————————————————–
एकूण ८०३४ ३३९