pandharpur ashadhi ekadashi 2021 update : महापूजेसाठी फक्त ठाकरे कुटुंबाला प्रवेश; मुख्यमंत्र्यांसमवेत ‘या’ दाम्पत्याला मिळणार महापूजेचा मान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – pandharpur ashadhi ekadashi 2021 update : मुंबई आणि पुणे परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचे कुटुंबिय यांच्या मुंबई ते पंढरपूर प्रवासासाठी रस्ते आणि हेलिकॉप्टर वाहतूकीची पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे. पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबाचा प्रवास निश्चित करण्यात येणार आहे. ते पंढरपूरला सायंकाळपर्यंत पोहचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. महापूजेसाठी यंदा केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय असणार आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याव्यतिरिक्त एकाही राजकीय व्यक्तीला येथे प्रवेश देण्यात येणार नाही.

विणेकरी केशव कोलते दाम्पत्याला मिळणार मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेचा मान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची आषाढी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात साजरी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २० जुलै रोजी पहाटे विठ्ठल रूक्मिणीची सपत्निक शासकीय महापूजा करणार आहेत. त्यांच्या समवेत महापूजेचा मान मंदिरातील विणेकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी सौ़ इंदूबाई कोलते यांना मिळाला आहे.

मानाचे वारकरी केशव कोलते हे विदर्भातील वर्धा येथील असून त्यांचे वय ७१ वर्षे आहे. गेल्या २० वर्षांपासून ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. गेल्या वर्षीपासून वारी भरत नसल्याने महापूजेचा मान विणेकर्‍यांना देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यानुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे केशव कोलते यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title :  pandharpur ashadhi ekadashi 2021 update  : Only Thackeray family can enter for Mahapuja