Pandharpur curfew । 17 ते 25 जुलै पंढरपुरात संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सोलापूर / पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pandharpur curfew । राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती कायम आहे. तसेच, याच काळात यंदा आषाढी वारी असल्याने गर्दीमुळे कोणताही धोका संभवू नये या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपुरात संचारबंदी (Pandharpur curfew) लावण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर (Pandharpur) सह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये 17 जुलै दुपारी 12 वाजल्यापासून ते 25 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत संचारबंदी (curfew) जाहीर केली गेली आहे. तसेच, 18 जुलै ते 25 जुलै या कालावधी दरम्यान चंद्रभागा नदीत स्नान करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. (Curfew in Pandharpur from July 17 to 25)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यंदाच्या होणाऱ्या आषाढी वारीसाठी वाखरी येथे मनाच्या 10 पालख्या 19 तारखेला येणार आहेत. तेथून प्रतीकात्मक पायी वारीसाठी वीस-बावीस पर्यंत चाळीस-चाळीसच्या 10 गटांत हे वारकरी येणार आहेत. तेथून पुढे प्रत्येक पालखीचे 2 प्रतिनिधी असे एकुण वीस लोक पुढचे साडेचार किलोमीटर पायी चालतं येणार आहेत तर बाकी 380 लोक आपापल्या गाडीमध्ये आपापल्या मठांकडे प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा (Police system) सज्ज केल्या आहेत.

सोलापूरच्या ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी माहिती दिली आहे की,
सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका आणि पंढरपूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
यासाठी 3 हजार पोलीस (3 thousand police) सज्ज असणार आहेत.
तसेच, वारीला परवानगी असणारे वारकरी आणि पोलीस यांची कोरोना चाचणी करूनच पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती अधीक्षक सातपुते यांनी दिलीय.

Web Title :- pandharpur curfew | curfew in pandharpur from july 17 to 25

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bhimrao Tapkir | …म्हणून खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर अधिवेशनास उपस्थित राहणार नाहीत

MPSC Student Swapnil Lonkar Suicide Case | पुण्यातील स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला आली जाग, घेतला मोठा निर्णय

Pregnancy Diet | …म्हणून गर्भावस्थेत ‘या’ 5 गोष्टींचं सेवन करणं अत्यंत उपयुक्त