पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ : मतमोजणीत भाजपच्या समाधान आवताडेंची मुसंडी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरु झाली असून पहिल्या फेरीत टपाल मतांची मोजणी करण्यात आली. त्यात एनसीपीचे भगीरथ भालके हे आघाडीवर आहेत. भालके यांना २३१० टपाल मते मिळाली असून भाजपचे समाधान अवताडे यांना १३७२ मते आणि अपक्ष शैला गोडसे यांना ३० मते मिळाली आहेत. दरम्यान, दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके हे आघाडीवर आहेत.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतमोजणी आज सकाळी १४ टेबलांवर सकाळी ८ वाजता सुरु झाली. त्यातील तीन टेबलांवर टपालाने आलेली मते मोजण्यात आली. त्यात भालके यांना आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत भालके आघाडीवर आहेत. 100 पेक्षा जास्त मतांनी ते आघाडीवर असल्याचं चित्र सध्या आहे.तिसऱ्या फेरीत देखील भालके आघाडीवर आहेत. भाजपचे समाधान आवताडे हे पिछाडीवर आहेत.
NCP चे भगीरथ भालके हे 4 फेऱ्यानंतर 600 पेक्षा जास्त मताने आघाडीवर आहेत.5 व्या फेरीत देखील भालके आघाडीवर आहेत.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणी होत आहे. या पोटनिवडणुकीत भालके यांना सहानभुती मिळणार की भाजपचे समाधान अवताडेंना ही जागा मिळणार. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या सचिन शिंदे यांच्या उमेदवारीचा फायदा नेमका कोणारा फायदा होणार हे आजच्या निकालावरुन स्पष्ट होणार आहे. 10 व्या फेरी अखेर समाधान अवताडे यांनी मुसंडी मारली असून राष्ट्रवादीचे भालके पिछाडीवर पडले आहेत.

पंढरपूर ग्रामीणच्या 22 गावातून तसेच पंढरपूर शहरातून भाजपचे समाधान अवताडे यांना 2166 चे 8 व्या फेरीअखेर लीड मिळाले होते. यानंतर नव्या फेरीत देखील समाधान अवताडे यांनी आघाडी घेतली होती. 10 व्या फेरीअखेर समाधान अवताडे यांना 28776 मते मिळाली आहेत तर भालके यांना 27133 मते मिळाली आहेत. समाधान अवताडे 10 व्या फेरीअखेर 1643 मतांनी आघाडीवर आहेत.

पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रीवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. सहानभुतीच्या लाटेत भाजपने राष्ट्रवादीला तगडे आव्हान दिले आहे. एकूण 19 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी खरी लढत भालके-अवताडे यांच्यामध्ये होणार आहे.

राष्ट्रवादीचे भालके यांच्या प्रचाराकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे तळ ठोकून होते. मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार, गुलाबराव पाटील, प्रणिती शिंदे तसेच महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचाराकरीता माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.