Homeताज्या बातम्याPankaja Munde | 'मी अजिबात नाराज नाही, पण...' मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) नुकताच झाला. मात्र, मंत्रिमंडळात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा समावेश नसल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात एकीकडे मित्रपक्षांतून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात असताना दुसरीकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मात्र आपण नाराज नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्याचवेळी आपल्याला मंत्रीपद न मिळाल्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

 

कार्यकर्त्यांना मी शांत केलं

पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण नाराज नसल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी नाराज आहे असं काहीही नाही. मी नाराज कशामुळे होणार ? उगीचच नाराज नाराज म्हणायचं. पण माझे कार्यकर्ते नाराज आहे हे खरं आहे. त्यांनी ती नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यांना मी शांत केलं आहे. त्यांना दु:ख वाटत असेल. पण ते दु:ख वाटणारच. ते साहजिकच आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

संघर्ष व्यक्तीविरुद्ध नाहीतर प्रवृत्तीविरुद्ध

मी मंत्री असताना सुद्धा खूप संघर्ष केला आहे. किती आरोपांना (Allegation) सामोरे गेले. किती संघर्षांना सामोरे गेले.
मंत्री असताना माझा एक दिवस सुखाचा बघितला आहे का तुम्ही ? हा संघर्ष कुठल्या व्यक्तीविरुद्ध नाही, तर प्रवृत्तीविरुद्ध आहे.
हा संघर्ष माझा सुरुच राहणार आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

 

माझा तर मुंगीचा देखील वाटा नाही

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं याचा आनंद आहे.
मात्र मी या प्रक्रियेमध्ये कुठेच नव्हते त्यामुळे खोटं श्रेय मी घेणार नाही.
शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापनेत माझा खारीचा काय, माझा मुंगीचा देखील वाटा नाही.
या प्रक्रियेमध्ये मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळात समावेश न केल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

 

Web Title : – Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News