Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांच्या ट्विटनंतर दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्तासंघर्षाच्या लढाईत सर्वात पुढे असलेले शिंदे गटाचे (Shinde Group) नेते आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पहिलं पत्र लिहून नाराजी कळवणारे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मंत्रिमंडळात (Cabinet) स्थान मिळाले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याच दरम्यान संजय शिरासाट (Sanjay Shirsat) यांनी एक ट्विट करुन सर्वांनाच धक्का दिला होता. या ट्विटची चर्चा सुरु असताना शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी फोनवर संपर्क साधत याबाबत खुलासा केला आहे.

 

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या ट्विटबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, एखादं ट्विट केल्यावर त्यात काही चूक वाटत असेल तर आपण ते डिलीट करतोच. त्यामुळे, त्यात वावगं नाही. पण संजय शिरसाट यांना लवकरच मंत्रीपद मिळणार आहे, हे ओपन सिक्रेट आहे, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले. म्हणजे यापूर्वी भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि आता संजय शिरसाट या दोन नेत्यांना मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं अधिवेशनापूर्वीच केसरकर यांनी जाहीर केल्याचे पहायला मिळत आहे.

 

संजय शिरसाट यांनी ट्विट करत कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे असं म्हटलं होतं. तसेच विधानसभेतलं (Legislative Assembly) उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची क्लिप जोडली होती. पण काही वेळात हे ट्विट डिलीट करण्यात आले. तसेच आपण नाराज नसून शिंदे गटात आम्ही सर्वजण खूश आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, शिरसाट यांच्या ट्विटनंतर ते मंत्रिपद न मिळाल्याने नाराज तर नाहीत ना, त्यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण ट्विट करत शिंदे गटाला इशारा दिला नाही ना, अशा चर्चांना उधाण आले आहे.

ते ट्विट टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे
ट्विट संदर्भात स्पष्टीकरण देताना संजय शिरसाट म्हणाले, माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे ती पोस्ट गेली.
ठाकरे कुटुंबाबद्दल (Thackeray Family) अपशब्द निघणार नाही, हीच आमची भूमिका आहे.
परंतु टीका केली तर उत्तर मिळणार असल्याचे शिरसाट यांनी यावेळी सांगितले. मी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे.
मला औरंगाबद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Guardian Minister) द्यावे अशी मागणी केल्याचंही शिरसाट यांनी सांगितले.

 

Web Title :- Sanjay Shirsat | minister deepak kesarkar after sanjay shirsats shocking tweet kesarkar told open secret

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | केएफसीची फ्रेंचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने 80 लाखांना गंडा

 

Municipal Corporation Election | चार सदस्यीय प्रभाग निर्णयाविरोधात पुणे राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

 

Pune PMC News | टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कूलच्या आठमुठ्या भुमिकेमुळे कात्रज- कोंढवा रस्त्याच्या तिढा वाढला !