Pankaja Munde On Thackeray Government | पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला सवाल; म्हणाल्या – ‘अडीच वर्ष काय केलं ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde On Thackeray Government | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation Maharashtra) पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) झटका दिला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. दोन आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करा असाही आदेश न्यायालयाकडून देण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Pankaja Munde On Thackeray Government)

 

”तुम्हाला वेळ देऊन देखील तुम्ही डेटा दिला नाही. अडीच वर्षे तुम्ही काय केलं ? हा प्रश्न कोर्ट विचारत आहे आता यातून मार्ग कसा काढणार आहात ? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये. ओबीसी आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यानंतर निवडणुका लावा. मी ओबीसी नेता नसले तरी हीच भूमिका घेतली असती. आज राजकीयदृष्ट्या ओबीसीचे भवितव्य धोक्यात आहे. सरकारने निर्णय करावा पण ओबीसी आरक्षणासोबत करावा,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. (Pankaja Munde On Thackeray Government)

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, ”कुणीही पक्ष या विरोधात काही करत असे म्हणणे चुकीचे आहे.
सत्ताधारी पक्ष याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. अडीच वर्षे तुम्ही काय केलं ? हा प्रश्न कोर्ट विचारत आहे.
आता यातून मार्ग कसा काढणार आहात ? ओबीसी आरक्षणाला हा धोका देण्याचा प्रयत्न आहे. हे सरकार फक्त निधीवर अवलंबून आहे. तुम्ही रस्ते, स्मारक, इमारतीना निधी देतात पण ओबीसी आरक्षणाचा डेटा गोळा करण्यासाठी का निधी देत नाहीत. ओबीसी वर्ग मागे पडत आहे आणि हा त्यांना पुढे येऊ द्यायचे नाही का ? असा संशय येत आहे.”

 

Web Title :- Pankaja Munde On Thackeray Government | what have you done for two and a half years pankaja mundes question to the state government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा