Pankaja Munde | “…मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. पंकजाच्या (Pankaja Munde) वक्तव्याने राजकीय वर्तुळात नेहमीच खळबळ उडालेली असते. पंकजा या नेहमीच पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करत असतात. मात्र पक्षाकडून पंकजा मुंडेंवर अन्याय होत असल्याचे विधान अनेकदा विरोधकांकडून बोलले जात होते. यावर पंकजा यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही तर देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) हे जाणून बुजून त्यांना डावलतात असा आरोपही अनेकदा केला गेला होता. एकदा तर पंकजा मुंडे यांनी “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री” असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि पक्षामध्ये एकच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.
पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी येथे जलजीवन मिशन योजनेचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी पंकजा या उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, “कार्यकर्त्यांनी खंबीरपणे आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे असते. देशाची पंतप्रधान (Prime Minister ) एक स्त्री होती मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर सध्या त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी पुढे बोलताना पंकजा (Pankaja Munde) म्हणाल्या की,
“लोकांसाठी झटून काम करणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. जे माझ्यात रुजले आहेत त्याच संस्कारावर
चालणारी ही तुमची ताई आहे. ताईंमध्ये काही खोटं असेल तर तुम्ही उघडपणे सांगू शकता”.
याआधी देखील पंकजा यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे म्हटल्याने त्यांची राजकीय
महत्त्वाकांशाची चर्चा जोरात रंगली होती. त्यामुळेच त्यांना पक्षातून दूर ठेवण्यात येत असल्याचे बोलले जात होते.
आता पुन्हा त्यांनी थेट पंतप्रधानपदी भाष्य केल्याने आता पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title : Pankaja Munde | then your father will not be the prime minister pankaja mundes statement will be discussed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
ACB Trap On Police Havaldar | 25 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अॅन्टी करप्शनच्या जाळयात