Pankaja Munde vs Dhananjay Munde | बीडमध्ये भाजपचं वर्चस्वं ! पंकजा ताईंचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’; निकालानंतर धनंजय मुंडेंवर निशाणा…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde vs Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील (Beed) पाच नगरपंचायत निवडणुकांचे निकाल (Nagar Panchayat Election Result) हाती आले आहेत. आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतमध्ये भाजपने (BJP) आपलं वर्चस्व राखलं आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) हार मानावी लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेत सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी (Pankaja Munde) बाजी मारली आहे. त्यामुळे पंकजाताईंंनी राष्ट्रवादीला (NCP) ‘दे धक्का’ केला असल्याचं म्हटलं जात आहे. (Pankaja Munde vs Dhananjay Munde)

बीडमध्ये भाजपने (BJP) आपला गड राखला आहे. केज नगरपंचायत मध्ये (kej Nagar Panchayat) काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील (MP Rajnitai Patil) यांना पराभव पत्कारावा लागला आहे. तर, पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे (Raju Bhau Munde) यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत (Wadwani Nagar Panchayat) राष्ट्रवादीच्या हाती गेल्यामुळे भाजपला एक मोठा झटका बसला आहे. (Pankaja Munde vs Dhananjay Munde)

”सत्ता असून देखील यश मिळवणं कठीण झालंय. भाजपला लोकांनी चांगली साथ दिली आहे. बीडमध्ये सर्व नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन. बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतायत तशी लढत नव्हती, बीड जिल्ह्याच्या गेल्या अडीच वर्षातील लोकांचा रोष आणि अपेक्षांचं निकाल आहे.” तर, ”बीड जिल्ह्यामधील एकही आमदार दुसऱ्या मतदारसंघाचा विचार करत नाही त्यामुळे सर्वांगीण विकास कोणी करत नाही. भाजप विरोधी पक्षात नाहीये, सत्ता स्थापनेचा कौल महाराष्ट्राने दिलाय पण केवळ राजकारणामुळे भाजप सत्तेत नाहीये. भाजपचा आकडा वाढतोय त्याकडे आमचं लक्ष आहे,” असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

आष्टी नगरपंचायत –

भाजप – 13

राष्ट्रवादी – 02

काँग्रेस – 01

अपक्ष – 01

एकूण – 17

शिरूर कासार नगरपंचायत –

भाजप – 11

राष्ट्रवादी – 04

शिवसेना – 02

एकूण – 17

वडवणी नगरपंचायत –

भाजप – 08

राष्ट्रवादी – 06

राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी – 03

एकूण – 17

केज नगरपंचायत –

राष्ट्रवादी – शेकाप – 05

काँग्रेस – 03

जनविकास आघाडी – 08

अपक्ष – 01

एकूण – 17

पाटोदा नगरपंचायत –

भाजप – 09

भाजप पुरस्कृत – 06

महावि – 02

एकूण – 17

Web Title : Pankaja Munde vs Dhananjay Munde | BJP leader pankaja munde slams NCP minister dhanajay munde after beed district nagar panchayat election result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

 

Income Tax Saving Tips | आई-वडिलांची देखभाल करून सुद्धा वाचवू टॅक्स, जाणून घ्या काय आहे नियम