पंकजा मुंडेंना एक तासासाठी मुख्यमंत्री करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पंकजा यांना एक तासासाठी का होईना, पण सवार्नुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे आणि आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे, असे सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B00RM1EC1S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64939021-9219-11e8-9afa-aff2e6d6f1e3′]

परळी येथील मराठा समाजाने सुरु केलेल्या ठिय्या आंदोलकांसमोर बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्यासमोर मराठा आरक्षणाची फाईल असतील तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मराठा आरक्षणावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील जुगलबंदीवर प्रकाश टाकला आहे. तसेच मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्र्यांची झोप उडाल्याचेही उद्धव यांनी म्हटले.

मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्र्यांची झोप उडविल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री पहाटे तीन वाजेपर्यंत जागून काम करतात, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगतात. कदाचित ते खरे असेलही, कारण मराठा क्रांती मोर्चाने झोप उडवल्यावर जागे राहावेच लागेल आणि पापणी मिटली तर पंकजा मुंडे आरक्षणाच्या फाईलवर सही करतील, म्हणून झोप उडाली असल्याचे  टीकास्त्र सामनाच्या अग्रलेखातून पंकजा मुंडे यांनी शिवरायांची शपथ घेऊन म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ असा घेता येईल की, मराठा आरक्षणासंदर्भात फाईल मोकळी करायला सरकारकडून चालढकल केली जात आहे. जे पंकजा मुंडे यांना जमू शकते ते फडणवीस यांना का जमू नये?. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नी एकाकी पडले आहेत काय? असा प्रश्न पडतो, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

पंकजा यांना एक तासासाठी का होईना पण सर्वानुमते मुख्यमंत्रीपद बहाल केले पाहिजे व तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी केली पाहिजे, पंकजातार्इंची भूमिका समजून घेतली पाहिजे, असा टोला ही यात लगावण्यात आला आहे.