पानशेत धरणफुटी : अति घाई नडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पानशेत धरण फुटण्यामागे त्याचा निवडणुकांमध्ये राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच धरणाचे बांधकाम ठरलेल्या वर्षांपेक्षा एक वर्ष अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला व तो यशस्वी न ठरल्याने धरण फुटले अशी टिका विरोधांपासून सर्व जणांनी केली होती. या धरण फुटीच्या वेळी पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मधुकर हेबळे हे होते. चौकशी आयोगाने धरण बांधणाऱ्यांपैकी कोणालाही दोषी न धरता एका पोलीस अधिकाऱ्याला दोषी धरले होते.

मधुकर हेबळे यांनी पानशेत धरण आणि मी या नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात धरण फुटी पूर्वीची परिस्थिती आणि त्यानंतर नेमण्यात आलेला न्या. बावडेकर आयोग, बावडेकरांचे आकस्मात निधन, त्यानंतर या दुर्घटनेत ज्यांचे नुकसान झाले त्या न्या. नाईक यांचा चौकशी आयोग आणि त्यांनी काढलेला निष्कर्ष याची माहिती या पुस्तकात दिलेली आहे.

[amazon_link asins=’B06Y64JP34′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a0772ea7-8590-11e8-a5c2-4b6d0abb87f3′]

पानशेत धरणाच्या बांधकामाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे ठरले होते.

१९५७-५८ : प्राथमिक स्वरूपाचे काम, रोधीचर खणणे. शक्य तितके बांधकाम.
१९५८-५९ : तात्पुरता सांडवा खोदणे, तो कार्यानिव्त होईल इतपत धरणाचे बांधकाम, कंदर (गॉर्ज) भरणे.
१९५९-६० : धरणाचा भाग पूर्ण खंडापर्यंत बांधणे.
१९६०-६१ : तात्पुरता सांडव्याचा भाग सोडून धरण पूर्ण उंचीपर्यंत बांधणे.

१९६२-६३ : तात्पुरता सांडव्याच्या भागांत धरण पूर्ण करणे.

धरण नियोजित वेळे आधी पूर्ण करायच्या घाईचे खरे कारण वेगळेच होते. १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला जेमतेम बहुमत मिळाले होते. १९६२ च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्याकरिता कॉंग्रेसला काही भव्यदिव्य करून मते जिंकणे अगत्याचे होते. पानशेतसारखा प्रकल्प प्रथम ठरलेल्या तारखेच्या तब्बल एक वर्ष अगोदर आणि अर्थात निवडणुकीआधी पूर्ण करणे हीच ती भव्यदिव्य गोष्ट होती. थोडक्यात हा राजकीय निर्णय होता. त्यासाठी एक वर्ष अगोदर धरण पूर्ण करुन ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवायचे होते. पण जून १९६१ पर्यंत सर्व कामे पूर्ण झाली नाही. जूनमध्येच पावसाने थैमान घातले होते़ त्यात अपूºया व कच्च्या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात केल्याने पाण्याने ते भरून शेवटी फुटले होते. या धरणफुटीच्या चौकशीतून नेहमीप्रमाणे सर्व आयएएस अधिकारी निर्दोष सुटले. धरणाचे बांधकाम करणारेही कोणी दोषी ठरले नाही. शेवटी सर्व खापर फोडण्यात आले ते त्यावेळी पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मधुकर हेबळे यांच्यावर. अत्यंत प्रामाणिक अधिकाऱ्याला अनेक वर्ष अपमान सहन करावा लागला. त्यावेळची काय परिस्थिती होती. महापालिका आयुक्त स. गो. बर्वे व पाटबंधारे अधिकाऱ्यांनी कशी स्वत:ला यापासून नामानिराळे ठेवले. याची संपूर्ण हकिकत त्यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे. या पुस्तकानंतर पानशेत पूराबाबत नव्याने विचार केला गेला.