पुण्यातील सावकारानं घेतले 49 लाखाचे 2 कोटी रूपये, व्याजाच्या तगाद्यामुळं कर्जदारानं केलं पप्पू पडवळला ‘खल्लास’, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढव्यात सनसनाटी निर्माण केलेल्या ब्रम्हा काँट्री बिल्डिंगमध्ये घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ याचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे़ तब्बल ५ दिवस अथक परिश्रम घेऊन केलेल्या तपासानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधारासह तिघा जणांना ताब्यात घेतले आहे़ ४९ लाख रुपये व्याजाने दिले असताना त्यावर २ कोटी रुपये वसुल केल्यानंतरही आणखी सतत पैशाची मागणी केल्यामुळे व सततच्या धमकीमुळे वैतागलेल्या एकाने दोन साथीदाराच्या मदतीने पप्पू पडवळचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे़ .

लतिफ आबु शेख (वय ४३, रा.पारगेनगर, कोंढवा) असे प्रमुख संशयिताचे नाव आहे़ .
पप्पू पडवळ हा यापूर्वी गुन्हे करीत होता २०१४ नंतर त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही त्यानंतर त्याने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरु केला होता फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी घरी जाऊन पाहिले असता पप्पू पडवळ याचा खुन झाल्याचे ११ जुलै रोजी उघडकीस आले होते.

पप्पू पडवळ याने कोंढव्यातील लतिफ शेख याला वेळोवेळी ४९ लाख रुपये दिले होते.लतिफ हा स्क्रॅप व फॅबिकेशनचे व्यवसाय करतो कर्जासाठी त्याने फ्लॅट व कागदपत्रे गहाण ठेवले होते लतिफने त्याला आतापर्यंत २ कोटी रुपये दिले तरीही पप्पू पडवळ पैशाची मागणी करीत होता आणखी ८० लाख रुपये १५ तारखेपर्यंत दिले नाही तर तुझा मर्डर करतो, अशी धमकी दिली होती. त्यामुळे लतिफ याने पप्पूच्या खुनाचा कट रचला.

लतिफ यांची आई आजारी असताना त्याने एका मौलानाकडून तिच्यावर उपचार केले होते त्यातून ती बरी झाली होती ही गोष्ट त्याने पप्पूला सांगितली होती पप्पू यालाही झोप न येणे व इतर आजार होते त्याने लतिफला त्या मौलानाला घेऊन येण्यास सांगितले त्यामुळे पप्पूच्या घरात शिरण्याची संधी लतिफला मिळाली.

९ जुलै रोजी लतिफ पप्पूच्या घरी गेला त्याने मौलाना येत असल्याचे सांगितले काही वेळाने नेहरु शर्ट घातलेले दोघे जण आले त्यांच्या गळ्यात बॅग होती त्याने हे मौलाना आहेत, असे सांगितले आलेल्या दोघांनी पप्पूला खाली बसविले त्याच्यासमोर लिंबू कापून ठेवले व मंत्र म्हणण्याचा बहाणा करुन त्याला डोळे बंद करायला सांगितले जसे पप्पूने डोळे बंद केले तसे मागे उभे असलेल्याने आपल्याकडील बॅगेतून कोयता काढून पप्पूवर वार करायला सुरुवात केली त्याचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व जण घर बंद करुन निघून गेले.

११ जुलै रोजी पप्पूचा खुन झाल्याचे उघडकीस आले.
खून करताना कोणीही पाहणारे नव्हते पप्पू हा कोणा कोणाला व्याजाने पैसे देतो, त्याची नोंद एका डायरीत करत असे पोलिसांनी ही डायरी तपासली तेव्हा तो तब्बल ३५ टक्के व्याजाने पैसे देत असल्याचे दिसून आले त्यात शेकडो लोकांची नावे होती गेल्या चार पाच दिवसात कोंढवा पोलिसांनी सर्व तांत्रिक विश्लेषण करुन त्यापैकी अनेकांकडून माहिती घेतली त्यात त्याचा लतिफवर संशय बळावला.

कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पोलिसनामाशी सांगितले की ९ जुलै रोजी लतिफ कोठे कोठे गेला होता त्याची माहिती घेण्यास सुरुवात केली त्याने सांगितलेल्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा तो त्या ठिकाणी गेला नसल्याचे उघड झाले पोलिसांना सर्व समजल्याचे लक्षात आल्यावर लतिफ याने गुन्हा कबुल केला.

सहाब “मैने हैवान को मार डाला’’

तपास करताना पोलिसांनी त्याला ९ जुलै रोजी कोणते कपडे घातले होते, ते घेऊन येण्यास सांगितले तेव्हा त्याने ते कपडे आणल्यानंतर जॅकेट धुतले असले तरी त्यावर एका ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले तसेच त्याने तेव्हा सुरक्षारक्षकाची चप्पल वापरली होती उंड्री येथे तो गेलाच नव्हता हे सर्व उघड झाल्यावर तो पोलिसांसमोर उडू लावला व म्हणाला सहाब ‘‘मैने हैवान को मार डाला.

या प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे , सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग सुनील कलगुटकर , यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार , सहायक पोलिस निरीक्षक चेतन मोरे , स्वराज पाटील , उपनिरीक्षक संतोष शिंदे , सहायक पोलिस फौजदार इक्बाल शेख, विशाल गवळी, नितीन कांबळे, सुशील धिवार, सुरेश भापकर , गणेश अगाम, किरण मोरे, उमाकांत स्वामी, निलेश वणवे, संतोष नाईक , अझीम शेख, संजू कळंबे , योगेश कुंभार, ज्योतिबा पवार, कौस्तुभ जाधव, आदर्श चव्हाण, दीपक क्षीरसागर, मोहन मिसाळ, किशोर वळे यांनी बजावली आहे .

तपास अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव कुंभार गुन्हे यांनी पोलिसनामाला सांगितले की सतत पाच दिवस तपास करुन हा गुन्हा उघडकीस आणला.