Parambir Singh | परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगासमोर हजर होण्यासाठी बजावला चौथा समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना आज (बुधवारी) चांदीवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) उपस्थित राहण्यासाठी चौथ्यांदा समन्स (Fourth summons) बजावण्यात आले आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) यांना आज आयोगासमोर यावे लागेल, जेव्हा ते त्यापूर्वी आले नाहीत, तेव्हा त्यांना 25 हजार रुपयांचा दंड (fine) सुनावण्यात आला. आयोगाविरोधात मुंबई हाय कोर्टात (High Court) याचिका दाखल केली होती. यावरून हाय कोर्टाने आज कोणतेही निर्देश दिले नाहीत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील वसुलीच्या केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने (State Government) नियुक्त केलेल्या न्या चांदिवाल (Justice Chandiwal)आयोगाकडून माजी पोलीस आयुक्त (Former Commissioner of Police) परमबीर सिंह (Parambir Singh) यांना (मंगळवारी) 24 ऑगस्ट रोजी 25 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

दरम्यान, याअगोदरही न्या चांदिवाल (Justice Chandiwal)आयोगाकडून परमबीर याना 5
हजाराचा दंड सुनावला होता. अनिल देशमुख यांच्यावर आरोपाचे टाकलेले लेटरबॉम्ब यावरून CBI
चौकशी सुरु आहे. दरम्यान, राज्य शासनाने देखील चांदीवाल आयोग नेमला आहे. या आयोगाला परमबीर सिंह यांनी मुंबई हाय कोर्टात (High Court) याचिकेच्या माध्यमातून विरोध केला आहे. जर CBI या प्रकरणात तपास करत आहे तर मग आयोगाच्या माध्यमातून तपास कशाला हवा, असा युक्तिवाद देखील परमबीर सिंह यांच्या वतीने केला गेला आहे.

हे देखील वाचा

Crime News | भाजप नगरसेवकाकडून मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंधाची ऑफर, महिलेनं डायरेक्ट केलं ‘हे’ काम (व्हिडीओ)

Pune News | खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा TMC कमी पाणीसाठा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  parambir singh | fourth summons to parambir singh for present front of chandiwal commission

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update