Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ ! …तर अटक वॉरंट निघणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांंनी माजी गृहमंत्र्यावर आरोप केलेल्या शंभर कोटी रुपये लेटरबाॅम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्व घडामोडीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने (Chandiwal Commission) परमबीर सिंहांना अनेक वेळा समन्स बजावलं. मात्र, सिंह हे हजर झाले नाहीत. दरम्यान, आज (सोमवारी) परमबीर यांना आयोगाकडून उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

मागील प्रत्येक सुनावनीस परमबीर सिंह (Parambir Singh) हे उपस्थित राहत नाहीत. चांदीवाल आयोगाने सिंह यांना वारंवार समन्स बजावलं. पंरतु, सिंह एकाही समन्सनंतर चौकशी समितीसमोर हजर राहीले नाहीत. या प्रकरणाची चौकशी आज (सोमवारी) होणार आहे. आज परमबीर उपस्थित न राहिल्यास त्यांच्या विरोधात चांदिवाल आयोगाकडून (Chandiwal Commission) अटक वारंट निघण्याची शक्यता आहे.

 

परमबीर यांनी केलेल्या 100 कोटींच्या आरोपावरुन चौकशीसाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती केली. चांदीवाल कमिशनने चौकशी सुरू केल्यापासून परमबीर सिंह (Parambir Singh) वैद्यकीय कारणांमुळे रजेवर आहेत. चौकशी समितीसमोर उपस्थित न राहिल्यामुळे परमबीर यांना पन्नास हजाराचा दंड सुनावण्यात आला होता. सिंह यांनी दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केल्याची माहिती आहे. परमबीर यांनी सरकारने चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगावर प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केलीय.

दरम्यान, ठाणे पोलिसांच्या ताब्यात असणारे संजय पुनुमिया (Sanjay Punumia) हे परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय आहेत.
सिन्नरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करून कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनुमिया यांनी समृद्धी महामार्गालगत जमिनी लाटल्याचा संशय आहे आणि या जमीन खरेदीशी परमबीर यांचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करणार आहेत.

 

Web Title :- Parambir Singh | Parambir Singh’s difficulty increases! … so an arrest warrant will be issued?

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणे जिल्ह्यात पिकतोय पहिल्यांदाच ‘निळाकाळा भात’; हार्ट अटॅकपासून बचावासाठी उपयुक्त

Chandrakant Patil | ‘माझ्या मनात शरद पवारांबद्दल अनादर कधीच नव्हता, एकेरी उल्लेख अनावधानाने, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

BMC Election | भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात; शिवसेना नगरसेवकाचा दावा