मोहन डेलकर प्रकरणात परमबीर सिंग यांची संशयस्पद भूमिका, ‘या’ मंत्र्याचा आरोप

ADV

मुंबई : – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावरून राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. या प्रकरणामुळे सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असेच चित्र पाहायला मिळत आहे. यामध्येच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार मोहन डेलकर प्रकरणात माजी पोलीस आयुक्त ‘परमबीर सिंग यांची संशयास्पद भूमिका होती, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच मी गृहमंत्री असतो तर परमबीर सिंग यांना निलंबित केलं असते, असेसुद्धा नाना पटोले म्हणाले.

खासदार मोहन डेलकर प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयस्पद असल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. मी जर मंत्री असतो तर परमबीर सिंग यांना मी निलंबित केले असते. वास्तविक परबमवीर सिंग यांचे तात्काळ निलंबन केले असते, आणि करायला हवे होते असे माझे ठाम मत आहे असेदेखील नाना पटोले म्हणाले. दरम्यान भाजपच्या शिष्टमंडाळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट घेऊन राज्यातील परिस्थिती हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या या मागणीचा नाना पटोले यांनी आपल्या खास शैलीत चांगलाच समाचार घेतला.

ADV

काय म्हणाले नाना पटोले
‘विरोधी पक्ष चुकीच्या मार्गावर जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे, घटनेमागे नेमकं काय आहे हे यंत्रनेनं सांगावे. पण विरोधी पक्ष हाच चुकीच्या मार्गाने जात आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने कोणाची बाहुली होऊन नये’, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ‘अधिकाऱ्यांचा कशा पद्धतीने वापर केला जात आहे, महाराष्ट्रासाठी योग्य नाही. विरोधी पक्षा जनतेचा मुद्दा मांडत नाही. आज कोरोना लस महाराष्ट्रात दिली जात नाही. मुळात वाटा आणि घाटा हा फडवणीस सरकार मध्ये पाहिला आहे. फडवणीस सरकारच्या काळात आरएसएसचे लोक किती होते हे जाहीर करणार आहे’, असेदेखील नाना पटोले म्हणाले.

तसेच नाना पटोले यांनी ‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका संशयास्पद आहे, राजभवन कार्यालय भाजपामय झाले आहे. कोणत्याही मुद्दा घेऊन भाजपचे नेते राजभवनावर पोहोचत आहेत’ अशी टीकासुद्धा केली आहे. ‘फडणवीस सरकारमध्ये फडणवीस हे न्यायाधीश झाले होते.त्यांच्या सरकारच्या काळात अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण फडणवीस यांनी त्यांचे राजीनामा घेतले नव्हते, अशी टीकासुद्धा नाना पटोले यांनी केली आहे.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधी बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. पण आपल्याला बोलका पीएम भेटला आहे ते बोलतात. विरोधी पक्ष म्हटले म्हणून बोलावेच असे काही नाही’, असा टोलासुद्धा नाना पटोले यांनी फडणवीसांना लगावला आहे. ‘जे भ्रष्टाचारानी गुंतलेले आहेत ते आमच्यावर कसला आरोप करत आहेत. भाजपवाले वाटा कसे घेतात ते जनतेला माहित आहे काँग्रेस असले वाटा घेत नाही, असा टोलासुद्धा नाना पटोले यांनी लगावला आहे.