पालकांनी ‘या’ सूचनाचे पालन करावे, महाराष्ट्र ‘सायबर’कडून आवाहन

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे हा जीवघेणा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केले आहे. शाळा, मॉल्स, अनेक व्यापार आणि व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिकांवर घरी राहण्याची वेळ आली. सगळेच जण घरात असल्यामुळे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर अधिक वाढला आहे. यावर महाराष्ट्र सायबरनं प्रत्येक पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना केली आहे.

पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. 7 ते 18 वयोगटातील मुलांच्या पालकांनी ऑनलाईन सर्फिंगवर करताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावे. जर मुलं ऑनलाईन चॅटिंग करत असतील तर समोरची व्यक्तीची माहिती करून घेणं आवश्यक आहे.

तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप आणि कॉम्पुटरद्वारे कोणत्या संकेतस्थळावर क्लीक करत आहेत किंवा कोणते संकेतस्थळ बघत आहेत? यावर लक्ष ठेवा. कारण गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आपली मुलं अशा कोणत्याही जाळ्यात अडकू नये, याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे.

पालकांनी पोर्नोग्राफिक संकेतस्थळ शोधून क्लिक करणे टाळावे. सध्या चाइल्ड पोर्नोग्राफी बघण्याचे प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कुणी ऑनइलान धमकावत नाही ना?, याची खात्री करायला हवी. आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स आणि त्यांचे पिन क्रमांक पाल्यास देऊ नये. ऑनलाइन खरेदी करताना मुलांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा, अशा सूचना महाराष्ट्र सायबरकडून दिल्या आहेत.

आपला मुलगा कोणत्याही ऑनलाइन फसवणूक किंवा ऑनलाइन रॅकेटमध्ये किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचा शिकार बनलेत , अशी माहीत हाती आल्यास घाबरून न जाता नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा. त्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा द्या, असे आवाहन सायबर विभागाकडून केले आहे.