‘या’ कारणामुळे सोनाक्षी व परिणितीमध्ये जुंपली

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमधील अभिनेत्रींमधील शीतयुद्ध हे नवीन नाही. सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. याच्या मागचे कारण आहे त्यांच्या आगामी चित्रपटातील भूमिका. सोनाक्षी आणि परिणीती‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत.

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात सोनाक्षी आणि परिणीतीदेखील आहेत. मात्र आपणच या चित्रपटातली मुख्य अभिनेत्री असल्याचं सोनाक्षी सर्वांना सांगत असल्यानं परिणीती नाराज झाली आहे. परिणीतीनं याबद्दल प्रोडक्शन हाऊसकडे तक्रारही केली असल्याची माहिती मिळाली आहे .या चित्रपटात दोघींच्या समान भूमिका असूनही सोनाक्षीनं मुख्य अभिनेत्री असल्याचा दावा करणं परिणीतीला खटकलं, त्यामुळे दोघींमध्ये कोल्डवॉर सुरू झालं. परिणीतीनं सेटवर सोनाक्षीशी बोलणे बंद केलं आहे.

‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात अजय देवगणसह संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा, राणा दग्गुबती आणि ऐमी विर्क ही दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत. अजय या चित्रपटामध्ये स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात येणार आहे. कर्णिक हे भारत पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते. भूज तळावरील धावपट्टी हवाई दलाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. कर्णिक यांनी त्यावेळी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील ३०० महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. या चित्रपटात त्यांचा ही धाडसी निर्णय आणि हवाई दलाची वाटचाल पहायला मिळणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.