पेशी असल्यानं 13 पोपटांना केलं दिल्लीच्या कोर्टात ‘हजर’, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत एक अनोखे प्रकरण समोर आले असून येथील पतियाळा न्यायालयात 13 पोपटांना हजर करण्यात आले. या पोपटांची तस्करी करून त्यांना विदेशात पाठवण्याची तयारी करण्यात येत होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर या पोपटांची तस्करी करून त्यांना ताशकंदला नेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण –
पोपटांची तस्करी करून हा व्यक्ती हे पोपट उझबेकिस्तानमधील ताशकंदमध्ये घेऊन चालला होता. आरोपी हा तेथीलच रहिवासी असून त्याला दिल्ली विमानतळावर पोलिसांनी या पोपटांसह अटक केली होती. यानंतर त्याला पटियाळाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

पोपटांच्या खरेदीवर आहे बंदी –
आरोपी एका पॅकेटमध्ये या सर्व पोपटांना लपवून आपल्या देशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तपासादरम्यान पोलिसांना शंका आल्याने त्यांनी चौकशी केली असता आरोपीकडे हे पोपट आढळून आले. त्यामुळे पोपटांच्या खरेदी विक्रीवर बंदी असल्याने त्याला अटक करण्यात आली. तपासात त्याने पोलिसांना सांगितले कि, रस्त्यावर पोपट विक्री करणाऱ्यांकडून त्याने हे पोपट खरेदी केले असून सध्या तपास सुरु आहे. तसेच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी