अहमदनगर : ‘पतंजली’ची बनावट वेबसाईट तयार करणाऱ्यास ‘सक्तमजुरी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीची बनावट वेबसाईट तयार करून डीलरशिप देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास दोन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. विकासकुमार (रा. लालबिघा, नवादा, बिहार) हे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी एच. सी. चांदगुडे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.

याबाबत माहिती अशी की, राहुरी येथील देवीदास हौशीनाथ दहिफळे यांची तीन लाख रुपयांची फसवणूक झाली होती. दहिफळे यांना पतंजलीची डीलरशिप पाहिजे असल्याने त्य़ांनी पंतजली नावाच्या ऑनलाइन पतंजली स्टोअर डॉट कॉम या वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरून दिला होता. वेबसाइटवर राघवेंद्र सिंह याचा टोल फ्री नंबर दिला होता. टोल फ्री नंबरवर दहिफळे यांनी संपर्क साधल्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर तीन लाख रुपये भरण्यास सांगितले होते. दहिफळे यांनी तीन लाख रुपये भरल्यानंतर त्यांना पैसे भरल्याची पावती, पतंजली डीलरशिप दिल्याचे प्रमाणपत्र दहिफळे यांच्या मेलवर पाठविण्यात आले होते.

माल पाठविण्यासाठी आणखी दहा लाख रुपये मागितल्यानंतर दहिफळे यांना शंका आल्यानंतर दहिफळे यांच्या फिर्यादीवरून राघवेंद्रसिंह नावाच्या व्यक्तीविरुद्ध नगरच्या सायबर पोलिस स्टेशनला ३० ऑगस्ट २०१७ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील पवार व इतर कर्मचाऱ्यांना तपास करून बिहारमधील पटना येथून विकासकुमारला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बारा मोबाइल हॅण्डसेट, २४ सीमकार्ड, एक लॅपटॉप, १९ एटीएम कार्ड, बँकेचे पासबूक, पॅनकार्ड असे साहित्य जप्त केले होते. तपासात आरोपीने राज्यातील अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

या खटल्याची मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन पोलिसांनी दिलेले तांत्रिक पुरावे, पोलिस अधिकाऱ्यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील क्रांती कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like