रुग्णाच्या मृत्युनंतर नातेवाईकांची डॉक्टरांना बेदम मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रुग्णाच्या मृत्युनंतर जमलेल्या १२ ते १५ जणांच्या टोळक्याने तीन निवासी डॉक्टरांना मारहाण करुन हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याचा प्रकार नायर हॉस्पिटलमध्ये घडला. रुग्णाच्या नातेवाईकांनी सुरक्षा रक्षकावरही हल्ला केला. अग्नीपाडा पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने डॉक्टरांवरील हल्ला प्रकरणातील गुन्ह्याबाबत अधिक कडक कायदा करण्याची मागणी केली आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

या घटनेत डॉ. दीपाली पाटील, डॉ. गौरव गुंजन, डॉ. मॉइज व्होरा आणि सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. नायर हॉस्पिटलमध्ये राज किशोर दीक्षित (वय ४९) या रुग्णावर टीबी, न्युमोनिया या आजारावर उपचार करण्यात येत होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितली होती. रुग्णाने स्वत:च अन्ननलिकेजवळ लावलेल्या ट्युब काढून टाकल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊन सायंकाळी त्यांचा मृत्यु झाला.

डॉक्टरांनी रुग्ण मृत घोषित केल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी गोंधळ घालत डॉक्टर व सुरक्षारक्षकांना मारहाण केली. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून झाल्या सर्व प्रकाराने त्यांना मानसिक धक्का बसला आहे. अशाप्रकारे डॉक्टरांवर हल्ले होत असेल तर डॉक्टरांनी आपले काम कसे करायचे? यावर सरकारने हॉस्पिटलमधील सुरक्षा वाढवावी, इमर्जन्सी बटण लावावीत, तसेच कायदा आणखी कडक करावा, अशी मागणी मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी केली आहे.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या