Bihar Election 2020 : पाटण्यात मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलीकॉप्टरला अपघात, मोठी दुर्घटना टळली

पाटणा : पाटणामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. पाटणा एयरपोर्टच्या स्टेट हँगरवर शनिवारी सायंकाळी उशीरा मोठा अपघात घडला, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि जल संसाधन मंत्री संजय झा यांना घेऊन परतणारे हेलीकॉप्टर एयरपोर्टवर सुरू असलेल्या बांधकामाच्या तारांना धडकले. सुदैवाने या दुघटनेच्या वेळी कुणीही मंत्री हेलीकॉप्टरमध्ये नव्हते.

एएनआयच्या वृत्तानुसार, अपघातानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, ते झंझारपुरमध्ये निवडणुक प्रचार करून परतले होते. त्यांनी हेलीकॉप्टरचे रोट ब्लेडचे नुकसान झाल्याचे सांगितले. सोबतच ही दुर्घटना ते उतरल्यानंतर घडल्याचे सांगितले. ते पूर्णपणे सुरक्षित आणि ठिक आहेत.

सायंकाळी उशीरा पाटणा एयरपोर्टवर अपघात
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी उशीरा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद तसेच मंत्री संजय झा आणि मंगल पांडेय निवडणूक प्रचार आटोपून पाटणा एयरपोर्टवर परतले होते. त्यांना एयरपोर्टवर सोडून हेलीकॉप्टर स्टेट हँगमध्ये पार्किंगसाठी जात असताना त्याच्या पंख्याला तार धडकली. या अपघातात हेलीकॉप्टरचे तीन किंवा चार पंखे तुटले आहेत. मात्र, हेलीकॉप्टरच्या पायलटला दुखापत झालेली नाही.

पार्किंगच्या दरम्यान केबलला धडकला पंखा
हे चार सीटचे हेलीकॉप्टर एयरपोर्टवरून पार्किंगसाठी बिहार हँगरमध्ये गेले होते. तिथे हा अपघात झाला. मात्र, यावेळी हेलीकॉप्टर जमीनीवर होते. त्या ठिकाणी अगोदरच लावलेल्या तीन-चार हेलीकॉप्टर्सजवळ क्रमाने हेलीकॉप्टर लावताना हा अपघात झाला. पायलटने सांगितले की, उड्डाण घेताना असे झाले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.