त्यापुर्वी नितीश कुमारच्या सरकारनं मागवली होती RSSसह १८ संघटनांची गोपनिय माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. पण त्यावेळी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या काही दिवसांपूर्वी बिहार सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासहित काही वेगवेगळ्या संघटनांबद्दल गुप्तपणे तपास करण्यासाठी सांगण्यात आले होते. यासाठी गुप्त पत्र जारीही करण्यात आले होते. गुप्तचर विभागाने दिलेल्या या पत्रात बिहार पोलीसांतील सर्व अधिकाऱ्यांना आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघटनांसहीत इतर दलांच्या नेत्यांची नावं, पत्ता, पद आणि व्यावसाय अशी सर्व माहिती या पत्रात दिली होती.

गुप्तचर विभागाने दिलेल्या पत्रात आरएसएसचे पदाधिकारी आणि १७ सहायक संघटनांची माहिती काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात आरएसएस वीएचपी, बजरंग दल, हिंदू जागरण समिती, हिंदू राष्ट्र सेना, धर्म जागरण समिती, राष्ट्रीय सेविका समिती, दुर्गा वाहिनी स्वदेशी जागरण मंच, शिखा भारती, भारतीय किसान संघ, हिंदू महासभा, हिंदू युवा वाहिनीसह एकूण १९ सघटनांचा समावेश आहे. तसंच या आदेशावर पूर्ण काम करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता. हे पत्र गोपनीय असल्याने त्याची एक कॉपी बिहार पोलीसच्या स्पेशल बँचचे एडीजी, आयजी, आणि डिआयजी यांना देण्यात आली होती.

चिट्ठी वायरल होते ही इसपर सियासत भी शुरू हो चुकी है.

सध्या हे पत्र व्हायरल होत आहे. त्यावरून राजकारणास सुरुवातही झाली आहे. आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र यांनी एनडीए सरकारवर टीका केली आहे. या लोकांची भाजप आणि जेडीयू चे गठबंधन जबरदस्तीचे आहे. जी लवकरच तुटणार आहे. तसंच नीतीश कुमार केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्याच पक्षाच्या सदस्यांना जागा न मिळाल्याचा बदला घेत आहेत.

दरम्यान, या विषयावर भाजपचे आमदार संजय सरावगी यानी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तसंच आरएसएस अशी संघटना आहे जी देशासाठी काम करते. सध्या मी ते पत्र पाहिलेले नाही पाहल्यानंतर यामागील सत्यही पडताळून पाहण्यात येईल, असंही सरावगी यांनी सांगितलं.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी ‘हे’ ५ घरगुती उपाय, जाणून घ्या