चंद्राचा ‘शोध’ देखील काँग्रेसने लावला : भाजप नेते गिरिराज सिंह

पटना : वृत्तसंस्था – चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपानंतर आता या कार्यक्रमाचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेस-भाजप पक्षांत चढाओढ लागली आहे. चांद्रयान २ लाँच झाल्यानंतर काँग्रेसने ट्विट करून आठवण करून दिली की, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इस्रोचा पाया रचला होता. काँग्रेसच्या या ट्विटवर गिरीराज सिंह यांनी काँग्रेसची फिरकी घेतली. त्यांनी ट्विट केले की, “देशाला आठवण करून देण्याची हीच खरी वेळ आहे… चंद्राचा शोध देखील काँग्रेसनेच लावला होता.” काही वेळानंतर गिरिराजसिंह यांनी हे ट्विट डिलीट करून टाकले.

image.png


काँग्रेसने ट्विटमध्ये नेहरू आणि वैज्ञानिकांचा फोटो जोडून लिहिले होते की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दूरदर्शी पावलाची आठवण करायची हीच खरी ओळख आहे. त्यांनी १९६२ मध्ये INCOSPAR ची स्थापना करून स्पेस रिसर्च ची सुरवात केली होती. त्यानंतर इस्रोची स्थापना झाली.

काँग्रेसने मनमोहनसिंग यांचा ट्विटमध्ये उल्लेख करत लिहिले की, चांद्रयान २ प्रकल्पाला २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच मंजुरी दिली होती. यावर गिरिराजसिंह म्हणाले की, देशाला आठवण करून देण्याची गरज आहे की, चंद्राचा शोध देखील काँग्रेसनेच लावला होता.

 

आरोग्यविषयक वृत्त