भाजपला धक्का ! ‘हा’ पक्ष पडणार एनडीएतून बाहेर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची घडी बसवण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात देखील आपल्या मित्रपक्षांना जागा देऊन त्यांना देखील खुश केले. मात्र या सगळ्यात त्यांचा बिहारमधील मित्रपक्ष जेडीयू नाराज असल्याचे बोलले जात आहे. काही घटनांचा विचार करता नीतीश कुमार योग्य वेळेची वाट पाहत असल्याचा तर्क देखील लावला जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर जेडीयुला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. पण, जेडीयुनं ऑफर नाकारत एनडीएतूनसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र या सगळ्यात ते कुठेतरी नाराज असल्याचे एकूण घटनांवरून दिसून येत आहे.

निवडणूक रणनीतीकर आणि जेडीयू उपाध्यक्ष प्रशांत किशोर हे आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करणार आहेत. मात्र या सगळ्यात नितीश कुमार यांची भूमिका फार महत्वाची आहे. कारण त्यांच्या परवानगीशिवाय प्रशांत किशोर हा निर्णय घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे यामागे काय कारण आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगात आहे.

आरजेडीची ऑफर
या सगळ्या प्रकरणात नितीश कुमार यांना लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश आणि लालू यांच्या पक्षाने आघाडी करत सत्ता मिळवली होती. मात्र २०१७ मध्ये त्यांनी हि आघाडी तोंडात पुन्हा भाजपबरोबर येण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा ते एकत्र येतात कि फक्त चर्चा ठरते हे पाहणे महत्वाचे आहे.

मात्र या सगळ्यात नितीश कुमार यांनी सध्या सावध भूमिका घेतली असून ते योग्य वेळेची वाट पाहत असल्याचा अंदाज राजकीय पंडित व्यक्त करत आहेत.