Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका, ”यांच्याशी युती केल्याचा आज मलाही पश्चाताप होतोय…”

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन– Uddhav Thackeray | तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. तुमची जन्म कुंडली मांडा. तुमच्या पत्रिकेत राहु केतू असतील कारण तुमचा गुरु चांगला नाही. आज मलाही थोडा पश्चात्ताप होतो आहे, कारण त्यावेळी शिवसेना (Shivsena) प्रमुखांनी हिंदुत्व आणि भगव्यासाठी युती केली. पण हे भगव्यामध्ये भेद करणारे नालायक आहेत, असे वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर (BJP) जोरदार टीका केली.

नाशिक येथे शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा फोडाफोडीचे राजकारण करते. आम्ही ३० वर्षे तुमच्या बरोबर राहिलो ते उगाचच राहिलो का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक भगव्यामध्ये दुही माजवत आहेत. जय श्रीराम म्हणून काय होणार आहे? तशी घोषणा करणार असाल त्या रामासारखे वागा. मी आज मुद्दामहून सुरेश भटांच्या ओळी वाचून दाखवतो.

हे असे आहेत तरीपण हे असे असणार नाही
दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही
हे खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके
पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही

सुरेश भटांच्या वरील ओळी वाचून दाखवत उपस्थित शिवसैनिकांना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही जिवंत आहात, जागरुक आहात. तुम्हाला लढायचे कसे ते शिकवावे लागणार नाही. औरंगजेब म्हणाला होता की मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही.

ठाकरे म्हणाले, भाजपा महाराष्ट्रात दुहीचे बीज पेरत आहे. तोडा फोडा आणि राज्य करा, अशी यांची नीती आहे.
ही नीती इंग्रजांची होती. श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लीम लिग बरोबर सरकार स्थापन केले होते.
चले जाव चळवळ चिरडण्यासाठी पत्र दिले होते. हिंदुत्व आम्हाला शिकवू नका.
आम्ही छत्रपती शिवरायांचे, भवानी मातेचे भक्त आहोत, असे ठाकरे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : क्रिकेट खेळण्यावरुन तरुणांमध्ये राडा, दोघांना बेदम मारहाण; 8 जणांवर FIR

Pune ACB Trap News | पुणे: 5 लाखाच्या लाच प्रकरणात वकिल झाला मध्यस्थ; लाच घेताना वकिलासह पोलिस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा होरपळून मृत्यू (Video)

पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल चोरले, तर सिंहगड रोड परिसरात फोटोग्राफरचा कॅमेरा पळवला

Pune Police MPDA Action | आंबेगाव परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 92 वी स्थानबध्दतेची कारवाई

मुंढवा पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटकमधील पीडित मुलगी कुटुंबियांच्या ताब्यात