बारामतीचे शांघाय करणार अशी स्वप्ने दाखवणारे पवार बोगस मतांवर निवडून आले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – “बारामतीचा शांघाय करणारअशी मोठी मोठी स्वप्ने दाखवली मात्र त्यातलं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघातून मागील निवडणुकीत बोगस मतदानामुळे निवडून आले असा आरोप सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगली येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकरांशी बोलताना केला.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले होते यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, ” सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक तयारीची जबाबदारी माझ्याकडे आहे.त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी मी  घेत आहे. यातील अनेक कार्यकर्ते मागील निवडणुकीची वस्तुस्थिती आता सांगत आहेत. मराठी माणूस पंतप्रधान होणार,माढा लोकसभा मतदारसंघाचा बारामती शहराचा  शांघाय शहराप्रमाणे विकास करणार अशी मोठी मोठी स्वप्ने दाखवली. त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांना येऊ दिले नाही. मोठ्या प्रमाणात बोगस मतदान केले, असे पदाधिकारी, कार्यकर्ते सांगत आहेत. त्यावेळी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे मी तक्रारही केली होती. मात्र, माझ्या तक्रारीची त्यावेळी दखल घेतली गेली नाही.पण दाखवलेल्या स्वप्नांपैकी एकही स्वप्न पूर्ण झाले नाहीअसेही ते म्हणाले .

तर माढ्यातून लढण्यास तयार … 

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, आतापर्यंत मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. निवडणूक माझ्यासाठी काही नवीन नाही. जर पक्षाने आदेश दिल्यास मी माढा मतदार संघातून निवडणूक लढण्यास तयार आहे. पवारांनी मतदारांना मोठी स्वप्ने दाखवली पण त्यातलं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही त्यामुळे जनता आता पवारांच्या भूलथापांना भुलणार नाही. उलट गेल्या साडेचार वर्षात भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. त्याचा आम्हला फायदा होईल. भाजप सेना युती झाली आहे. मित्रपक्षांना देखील आम्ही एकत्रित घेऊ. यावेळी निवडणुकीसाठी आम्हाला कोणतीही अडचण नाही. असे सुभाष देशमुख म्हणाले