खुशखबर ! ‘Paytm’व्दारे घरबसल्या पैसे ‘कमवा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल पेमेंट सुविधा देणारी कंपनी पेटीएम आता तुम्हाला घर बसल्या पैसे कमवण्याची संधी देणार आहे. कंपनी यंदाच्या वित्त वर्षात शेअर ब्रोकिंग सेवा, नॅशनल पेंशन स्कीम (NPS), एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) व इतर वित्तीय उत्पादनांच्या विक्रीची योजना तयार करत आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्यांच्या मते महिती देण्यात आली की, सेबी कडून यासाठीची मंजूरी देण्यात आली आहे.
पेटीएमचे प्रवीण जाधव यांची सांगितले की, आम्ही शेअर ब्रोकिंग सर्विस, ईटिएफ, शेअरसाठी डिपॉजिटरी खाते, नॅशनल पेंशन स्कीम विकण्यास सुरुवात करेल. पेटीएम मनी पहिल्यापासूनच म्यूचुअल फंड विकत आहे.

मिळाली परवानगी –

त्यांनी सांगितले की पेटीएम मनीला पेंशन कोष नियामक आणि विकास प्राधिकरणातून मे महिन्यामध्ये पेंशन योजना विकणे आणि एप्रिलपासून शेअर ब्रोकिंग सेवा सुरु करण्यात परवानगी देण्यात आली आहे.
जाधव यांनी सांगितले की, आमच्या प्लेटफॉर्मवर जवळपास ७५ टक्के वापरकर्ते SIP (सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूक करतात. त्यांना गुंतवणूकीसाठी येथे अत्यंत सुरक्षित प्लेटफॉर्म मिळत आहे, ज्यामुळे आमच्या प्रति विश्वास वाढला आहे. SIP नोंदणी दरमहा वाढत आहे. लवकरच ही संख्या १० लाख पार होईल.

किमान १०० रुपये SIP-

पेटीएम मनी सेबीबरोबर इन्वेस्टमेंट अॅडवायजर आहे. यामुळे हे दुसऱ्या डिस्ट्रिब्यूटर्स पेक्षा वेगळे आहे. यातून कोणत्याही प्रकारचे कमीशन घेण्यात येत नाही, याशिवाय याचे गुंतवणूक दार देशातील सर्व ४० म्युचूअल फंडच्या कोणत्याही डायरेक्ट स्कीममध्ये गुंतवणूक करु शकतात. या मंचावर १०० रुपयांची छोटी SIP देखील सहज उपलब्ध होते. यामुळे शेअर मार्केटची माहिती असलेले लोक घरबसल्या पैसे कमावू शकणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त