PCMC Addl Commissioner Transfer | पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली, विजयकुमार खोराटे नवीन अतिरिक्त आयुक्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – PCMC Add Commissioner Transfer | राज्यातील सत्तेत झालेल्या बदलाचा पिंपरी चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ (Addl Commissioner Jitendra Wagh) यांना पहिला झटका बसला आहे. जितेंद्र वाघ यांची राज्य शासनाने (State Government) मुदतपूर्व बदली केली असून त्यांच्या जागी विजयकुमार खोराटे (Vijaykumar Khorate) यांची नियुक्ती केली आहे. पालिका प्रशासनातील अत्यंत कार्यक्षम अधिकारी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची तडकाफडकी बदली (PCMC Addl Commissioner Transfer) झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राज्याच्या सत्ता समीकरणात झालेल्या बदलाचे हे पडसाद असल्याची चर्चा सुरू झाली असून जितेंद्र वाघ यांची बदली त्याच अनुषंगाने असल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. वाघ यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (PCMC Addl Commissioner Transfer)

विशेष म्हणजे जितेंद्र वाघ यांना पुढे कोणत्या विभागाची आणि पदाची जबाबदारी देण्यात आली या बद्दल कुठलीही माहिती आदेशात देण्यात आली नाही. नगरविकास विभागाच्या (Urban Development Department) उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले (Deputy Secretary Priyanka Kulkarni-Chhapwale) यांच्या स्वाक्षरीने वाघ यांची बदली करण्यात आली आहे. जितेंद्र वाघ यांच्या जागी सोलापूर महानगर पालिकेतील (Solapur Municipal Corporation) उपायुक्त विजयकुमार खोराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या (Pune Metro Rail Project) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (जमीन) या पदावरुन जितेंद्र वाघ यांची 21 सप्टेंबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. प्रतिनियुक्तीवरील त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची बदली राज्य सरकारने केली आहे.

नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशात जितेंद्र वाघ यांची पिंपरी पालिकेतील प्रतिनियुक्तीवरील सेवा संपुष्टात आणून त्यांची सेवा मूळ महसूल व वन विभागात वर्ग करण्यात आल्याचे नमूद केले आहे.

Web Title :  PCMC Addl Commissioner Transfer | transfer of pimpri chinchwad additional commissioner jitendra wagh

Join our WhatsApp Group, Telegram,facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून सराफी दुकान लुटण्याच्या तयारीतील तिघांना अटक, हत्यारे जप्त

NCP Chief Sharad Pawar | पक्ष फोडणाऱ्यांना किंमत मोजावी लागणार ! खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे निलंबित करत शरद पवारांचा इशारा

Bank fraud case: CBI registers FIR against Pune-based builder