Pegasus | फडणवीस यांच्या कार्यकाळातील टेलीफोन टॅपिंगची चौकशी करा; नागपूरचे वकील अ‍ॅड. सतिश उके यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिगॅसिस (pegasus) पाळत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महाराष्ट्रातील टेलिफोन टॅपिंग (phone tapping) प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी या प्रकरणातील तक्रारदार ॲड. सतिश उके (Ad Satish Mahadevrao Uke) यांनी केली आहे. या प्रकरणात यापूर्वी चौकशीचे आदेश नागपूर न्यायालयाने दिलेले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

ॲड. सतिश उके (Ad Satish Mahadevrao Uke) यांनी या संदर्भात आज पत्रक प्रसिद्धीस देऊन ही मागणी केली आहे. ॲड. सतिश उके यांनी अजनी नागपुर (Nagpur) पोलीस स्टेशन येथे डिसेंबर 2020 मध्ये तक्रार केली होती. ॲड. उके यांनाही आपला फोन नंबर निगराणी खाली असून धमक्या येत होत्या म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. आणि न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते, उके यांनी फडणवीस यांच्या स्वीय सहाय्यक आणि ओ एस डी म्हणून काम करत असलेल्या निधी कामदार यांच्या आणि कौस्तुभ ढवसे यांच्या चौकशीची मागणी केली होती.

फडणवीस यांच्या कार्यकाळात ब्रिजेश सिंग यांच्या अधीपत्याखालील माहिती-जनसंपर्क खात्यामार्फत पाळत ठेवण्यात येत होती.
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla), हेमराज बागुल (Hemraj Bagul) असे अधिकारी हे काम करत होते.
त्यातील अनेकांनी परदेशात प्रशिक्षण घेतले होते.
नाना पटोले (nana Patole) यांच्या सहित काही न्यायमूर्तींचे फोन देखील टॅप झाले आहेत, असे ॲड. उके यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या कार्यकाळात परदेश दौरे करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी व्हावी असे पिगॅसिस (pegasus) प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ॲड. उके यांनी मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोणाकोणावर पाळत ठेवत होते, त्यांचा हेतू काय होता हे स्पष्ट होईल, असेही ॲड. उके यांनी म्हटले आहे.

Web Title : Pegasus | Investigate telephone tapping during Devendra Fadnavis’s tenure; Advocate Satish Uke of Nagpur Demand

Pune Crime | हॉटेल ‘गारवा’मुळे व्यवसाय होत नसल्याने ‘अशोका’चे मालक खेडेकरकडून आखाडेंच्या खूनाची सुपारी; 8 जणांना अटक, मारेकर्‍यांना दाखवलं होतं ‘हे’ आमिष

Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर

Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल