थरार ! दोरीच्या मदतीनं पूरग्रस्तांना ओलांडावा लागतोय रस्ता (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पावसाने या आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये पूरपरिस्थिती उदभवली होती. उत्तराखंडमध्ये सतत सुरु असणाऱ्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती अजूनही कायम आहे.

उत्तराखंडमधील पुरोळा येथील भागातील रस्ते पूरग्रस्त परिस्थितीमुळे बंद झालेले आहेत. सर्वत्र पाण्याने हाहाकार माजलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर असल्यामुळे पुरोळा येथील चार गावांना जोडणारा रस्ता बंद आहे. गेल्या सहा दिवसांपासून हा रस्ता बंद असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावर साचलेले पाणी ओलांडून जावे लागत आहे. पाणी वाहते असल्यामुळे कोणीही त्यातून वाहून जाईल अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आणि एक मुलगा रस्सीच्या साहाय्याने थरारक पद्धतीने एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना दिसत आहे. आजूबाजूला इतर लोकही आहेत मात्र पावसामुळे आणि वाहत्या पाण्यामुळे अशा परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –