काय सांगता ! होय – हो, ‘या’ गावातील लोकं करतात श्वानाची पूजा, कारण ऐकल्यावर तुम्ही म्हणाल…

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळे जण जय्यत तयारी करत असताना, एक गाव आहे जिथे सगळे गावकरी न चुकता दरवर्षी एका कुत्र्याची पूजा करतात आणि त्याच्या कामाचं स्मरण करतात. ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे. चिपळूणहुन गुहागरला जाताना चिखली गावाच्या रस्त्या लगत बाल्या कुत्र्याचं मंदिर आहे. जे तेथील ग्रामस्थांनी सामूहिकरित्या बांधलं आहे. त्यात बाल्याची चांदीची मूर्तीची स्थापना केली असून चांदीवडे वाडीतील ग्रामस्थ नियमितपणे या मंदिरातील मूर्तीची पूजा करतात.

गावातील जाणकार सांगतात कि, काही वर्षांपूर्वी गावाच्या भोवती घनदाट जंगल असल्याने बाल्या गावातल्या जनावरांसह इथल्या ग्रामस्थांचं जंगली प्राण्यांपासून संरक्षण करत असे. एवढेच नव्हे तर बाल्या चांदीवडे परिवारातल्या लोकांचं साहित्य आणून देत असे. शिवाय रात्रीच्या वेळी संपूर्ण वाडीचा पहारा देत असे, अशी आख्यायिका आहे.

त्यामुळे त्याच्या या रक्षणाप्रती कृतज्ञता दाखवत चिखली गावातली चांदीवडे वाडीतले ग्रामस्थ आजही त्याची देव म्हणून पूजा करतात. एवढंच नव्हे तर दर वर्षी 1 जानेवारीला गावातील प्रत्येक व्यक्ती संपूर्ण दिवस त्याच्या स्मरणात त्याच्या शौर्याचे आणि प्रामाणिकपणाचे गुणगान गात असतो.

बाल्याचं मंदिर तोडणार!

दरम्यान, गुहागर विजापूर महामार्गाचे काम पुढील काळात सुरू होणार असल्या कारणाने बाल्याचं मंदिर देखील तोडावे लागणार असल्याचे समजते आहे. मात्र, गावातील मंडळींनी याला विरोध न करता ते मंदिर दुसऱ्या जागी बांधून मिळावं, अशी विनंती राष्ट्रीय बांधकाम विभागाकडे केली आहे.

चिखली गावातली ही परंपरा अत्यंत दुर्मिळ आहे. त्यात , आजचा तरुण वर्ग देखील बाल्या कुत्र्याचं स्मरण करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा जपत आहे. 60-70 वर्षांपूर्वी एका कुत्र्याने केलेल्या उपकारासाठी त्याची कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या चांदीवडे वाडीतील मंडळींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यासारखा आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?