नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही तुमचे बचतीचे पैसे बँकेत बचत खात्यात ठेवत असाल तर तुम्ही तुमचे नुकसान करुन घेत आहेत, कारण अनेक बँका बचत खात्यावर तुम्हाला फक्त ३.५ ते ४ टक्के वार्षिक व्याज देतात. या तुलनेत महागाई आधिक आहे त्यामुळे बचत खात्यातून तुम्हाला मिळणारा परतावा कमी असतो. म्हणजेत बचत खात्यातून आधिक परतावा मिळत नाही. परंतू तुम्ही बचत खात्यासारख्याच इतर योजनेत गुंतवणूक करुन दुप्पट परतावा मिळवू शकतात.
काय आहे उपाय –
बचत खात्यासारखीच दुसरी योजना आहे ती म्हणजे म्यूचुअल फंडमधील लिक्विड फंड. लिक्विट फंड डेट म्यूचुअल फंड आहे. जे सरकारी सिक्युरिटीज, सर्टिफिेकेट ऑफ डिपॉजिट, ट्रेजरी बिल्स, कमर्शिअल पेपर्स आणि दुसरे डेट इंस्टूमेंट्स आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करु शकतात. ज्यात ९१ दिवसांसाठी देखील तुम्ही गुंतवणूक करु शकतात. तसेच यात जोखिम देखील कमी आहे. अनेक असे फंड आहेत, ज्यात तुम्ही वर्षाला ७.६ टक्कांपर्यंत परतावा मिळवू शकतात. म्हणजे बचत खात्याच्या जवळपास दुप्पट.
सर्व डेट फंडमध्ये लिक्विड फंडचा परतावा स्थिर असतो. गरज भासल्यास लिक्विड फंड १ दिवसात रोख परत केले जातात. मॅच्युरिटी कालावधी कमी असल्यास गरज पडल्यास जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही पैसे काढू शकतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला तर तुम्ही तो बँकत ठेवण्याऐवजी योजनेत गुंतवू शकतात. तुम्ही गुंतवणूक केल्याच्या दुसऱ्या दिवशी देखील पैसे काढू शकतात. म्हणजेच तुम्ही आठवड्याभरासाठी योजनेत गुंतवणूक करु शकतात.
एका वर्षात चांगल्या परतावा करणाऱ्या योजना –
फ्रैंकलिन इंडिया लिक्विड फंड – ७.६४ %
एक्सिस लिक्विड फंड – ७.५३ %
रिलायंस लिक्विड फंड – ७.५३ %
आदित्य बिर्ला सन लाइफ लिक्विड फंड- ७.४८ %
ICICI प्रुडेंशियल लिक्विड फंड – ७.४५ %
साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे
अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या
चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या
दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या
झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या
डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’
गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय