Personal Loan | तुम्हाला सुद्धा पैशांची गरज आहे का? इथं मिळेल मिनिटात 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : Personal Loan | जर तुम्हाला पैशाची खुपच गरज आहे तर इकडे-तिकडे भटकण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला काही मिनिटात 1 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज सहज मिळेल. ते सुद्धा सोप्या मासिक हप्त्यांवर. आम्ही बोलत आहोत – उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) बाबत. बँकेने नुकतीच घोषणा केली आहे की, ते आपल्या ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन (Personal Loan) सोप्या मासिक हप्त्यात काही मिनिटांमध्ये उपलब्ध करून देतील. याबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

कसे मिळेल लोन जाणून घ्या

बँक या सुविधेसाठी डिजिटल कर्जदाता आणि फिनटेक प्लॅटफॉर्म, लोनटॅपसोबत एक धोरणात्मक भागीदारी करेल. हे पाऊल उज्जीवनच्या स्मॉल फायनान्स बँकेच्या एपीआय (अ‍ॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) बँकिंग उपक्रमाचा भाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त API उपलब्ध करून दिले जातील, जो डिजिटल कर्ज, डिजिटल देणेदारी आणि फिनटेकला पेमेंटच्या उद्देशासाठी वेगवान आणि सुरक्षित टाय-अप करेल. हे पाऊल लोनटॅपच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांच्या एक मोठ्या श्रेणीसाठी बँकेच्या आर्थिक सेवांचा विस्तार करण्याच्या दुहेरी उद्देश सुद्धा पूर्ण करतो.

10 लाख रुपयांपर्यंत कर्ज

ग्राहक काही मिनिटात सहजपणे क्रेडिटवर मंजूरी प्राप्त करू शकतात. लोनटॅपने आतापर्यंत आपल्या
प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जवळपास 32,000 ग्राहकांना सेवा दिली आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक
लोनटॅपच्या प्लॅटफॉर्मवर कमाल 48 महिन्याच्या कार्यकाळासह 1 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत
व्यक्तिगत कर्ज देते.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, स्वस्त सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

UGC ने युनिव्हर्सिटी अ‍ॅडमिशन 2021-22 च्या परीक्षेसाठी गाईडलाईन्स आणि कॅलेंडर केले जारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Personal Loan | if you need money personal loan up to rs 10 lakh with easy tenure available in a minute check how

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update