प्रियांका-निक च्या लग्नावर ‘पेटा’ नाराज कारण… 

मुंबई : वृत्तसंस्था – अनेक दिवसापासून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरु होती. या लग्नात प्रत्येक गोष्ट खास असावी या कडे प्रियांका व निक ने विशेष लक्ष दिले होते. जोधपूरमधील उमेद भवन मध्ये हा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला. राजेशाही थाटात लग्न करणाऱ्या प्रियांकाच्या लग्नात हत्ती घोडे यांचा वापर करण्यात आला होता. या प्राण्यांच्या वापरामुळे पेटा ( PETA ) या प्राणी संस्थेने तीव्र नाराजी व्यक्तकरून यावर आक्षेप नोंदवला आहे.

या संबंधी पेटाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्टकरून या घटनेवर आक्षेप नोंदवलाआहे. शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये लग्नात प्राण्यांवर कशाप्रकारे अत्याचार होतात. आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारची साधने वापरली जातात हे दाखविण्यात आलं आहे. त्याप्रमाणेच या साऱ्याचा प्राण्यांवर होणारा परिणामही त्यात स्पष्टपणे दाखविला आहे. प्रियांका निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

लग्न हा तुमच्यासाठी आनंदाचा सोहळा असतो पण या दिवशी या प्राण्यांचे आतोनात हाल होतात. असं कॅप्शन या व्हिडीओ ला देण्यात आले आहे. ‘पेटा’ ने केलेल्या या ट्विटला प्रियांका काय प्रतिक्रिया देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याआधी प्रियांका लग्नात केलेल्या फटाक्यांच्याआतिषबाजी मुळे ट्रोल झाली होती