पेट्रोल 3 दिवसांमध्ये 16 पैशांनी झालं स्वस्त, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : शनिवारी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली. या तीन दिवसांत दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल १६ पैशांनी स्वस्त झाले आहे, तर कोलकातामध्ये पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. मात्र, सलग पाचव्या दिवशी डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसरीकडे या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे. तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे पेट्रोलच्या दरात पाच पैशांची कपात केली.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली-७४.८४ रुपये, कोलकाता- ७७.५० रुपये, मुंबई – ८०.४९ रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत ७७.८१ रुपये प्रतिलिटर झाली आहे. तर चार शहरांत डिझेलची किंमत अनुक्रमे ६६.०४ रुपये, ६८.४५ रुपये, ६९.२७ रुपये आणि ६९.८१ रुपये प्रतिलिटर इतकी आहे.

इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजमधील बेंचमार्क कच्च्या तेलाच्या सत्राच्या तुलनेत फेब्रुवारीच्या डिलिव्हरी करारात १. १४ टक्क्यांनी वाढून ६४.९३ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. व्यापार दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत ६५.७५ डॉलर वाढ झाली.

त्याच वेळी न्यूयॉर्क मर्कन्टाईल एक्सचेंजमधील अमेरिकन लाईट क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट जानेवारीच्या डिलिव्हरी करारात एक टक्क्याने वाढून ६०.४५ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला, तर डब्ल्यूटीआय ट्रेडिंगदरम्यान वाढून ५९.६१ डॉलरवर बंद झाला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like