पुन्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढ, नागरिक त्रस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

पुन्हा एकदा पेट्रोल १८ पैसे आणि डिझेल ३१ पैसे महागले आहे. मुंबईत आता पेट्रोलसाठी ८८ रुपये १२ पैसे मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी ७८ रुपये ८२ पैसे मोजावे लागणार आहेत. आठवडा भरापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीचे दर लिटरमागे अडीच रुपये कमी केल्याची घोषणा केली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने अडीच रुपयांचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा लाभ नागरिकांना झालेला नाही. या प्रयत्नानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cae400c9-ce9c-11e8-9267-3d2c9fe87eab’]

पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ सुरुच असल्याने पुन्हा एकदा पेट्रोल प्रति लिटर नव्वदीचा आकडा गाठण्याच्या तयारीत आहे. याआधी ११ ऑक्टोबरला पेट्रोल ९ पैसे तर डिझेल ३० पैसे महागले होते. आज पुन्हा एकदा दरवाढ झाली असून पेट्रोलचे दर ८८ रुपयांवर तर डिझेलचे दर ७८ रुपयांच्या वर गेले आहेत. मुंबईसह पालघर, डहाणू, तलासरीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ८८ रुपये झाला आहे. शेजारच्या गुजरात राज्यात पेट्रोलचा दर ८० ते ८१ रुपये प्रति लिटर असल्याने सीमाभागातील अनेक वाहनचालक इंधन भरण्यासाठी गुजरातकडे जात असल्याचे चित्र आहे.

PUNE : राजकीय महिलेवर अश्लिल टिका करणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल

दिल्लीत पेट्रोलसाठी प्रति लिटर ८२ रुपये ६६ पैसे मोजावे लागणार आहेत. तर डिझेलचा दर प्रति लिटर ७५ रुपये १९ पैसे झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबता थांबण्याचे नाव घेत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. येथेही पेट्रोलच्या दरात ०.१८ पैशांनी वाढ होऊन ते ८२.६६ रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेलच्या दरात ०.२९ पैशांची वाढ होऊन ते ७५.१९ रुपये प्रतिलिटरवर पोहोचे आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात ५ रुपयांची तर डिझेलच्या दरात ४ रुपये ६ पैशांची घट करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही.

[amazon_link asins=’B07DSDFLD3,B00LHRORMC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48ef6dcf-cea0-11e8-9f46-513682c4cd87′]