पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढले : विघ्न टळेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबताना दिसत नाही. परभणी, मनमाड आणि गोंदियासह मुंबईतही पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८९.४४ रुपये झाले आहेत. तर नांदेडमध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोल विक्री होत आहे. सोमवारी पुन्हा पेट्रोलच्या किंमती १५ पैसे आणि डिझेलच्या किंमती ६ पैसे प्रति लिटरने वाढल्या आहेत. पुण्यात पेट्रोल ८९. २२ रुपये तर डिझेल ७६. ९१ रुपये दराने मिळत आहे.

[amazon_link asins=’B017BAERSM,B014UM2QB4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc34bbe1-ba2c-11e8-a0c5-03697237f1a3′]

आज सोमवारी वाढलेल्या दरानुसार दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८२.०६ रुपये झाले आहे. तर डिझेल ७३.७८ रुपये झाले आहे. मुंबईत  पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८९.४४ रुपये झाला असून, डिझेलचा दर ७८.३३ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर नांदेडमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९१.२२ रुपये झाले आहेत. १ ऑगस्टपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्ट रोजी इंधन दरात एकदाच कपात झाली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी एक दिवस इंधन दरवाढ झाली नव्हती. हे दोन दिवस वगळता इंधनाचे दर वाढतच चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची आवस्था गंभीर होत चालली आहे.

पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, चार जिल्ह्यांत नव्वदीपार

रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या दरात होणारी वाढ यामुळे इंधन दरवाढ होत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे विरोधकांनी भारत बंदही पुकारला होता. मात्र त्यानंतरही होणारी इंधन दरवाढ थांबताना दिसत नाही. रुपयाने गाठलेला नीचांक आणि कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यावरुन मोदी सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.  पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आता गणेशोत्सवातही इंधन दरवाढीचे विघ्न कायम असल्याचे दिसते. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत  पेट्रोलियम आणि हिंदुस्तान  पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

लग्नात मित्राला गिफ्ट दिले पाच लिटर पेट्रोलचे कॅन