Budget 2019 : पेट्रोल-डिझेल महागलं, १ % सेसमध्ये वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते. या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी काय मिळणार याकडे लक्ष लागून होते. मात्र या अर्थसंकल्पात सामान्य माणसाची निराशा झाली असून या अर्थसंकल्पात सामान्य माणसाच्या खिशावर कात्री लागणारा निर्णय यात सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणो डिझेलच्या किंमतींत वाढ होणार असल्याची घोषणा केली. या इंधनावर सरकारने १ टक्का सेस वाढवण्याचा निर्णय घेतल्याने या इंधनाच्या दरात वाढ होणार आहे.

देशातील प्रमुख तेल कंपन्या दररोज या दरांचे समीक्षण करून यामध्ये चढ-उतार करत असतात. देशातील HPCL, BPCL, IOC या प्रमुख तेल कंपन्या या दरांचा आढावा घेऊन यामध्ये बदल करत असतात. दररोज सकाळी सहा वाजता हे वाढलेले दर लागू होत असतात. याचबरोबर डॉलर आणि रुपयाच्या अवमूल्यनावर देखील याचे दर ठरलेले असतात.

याप्रकारे ठरवली जाते पेट्रोल डिझेलची किंमत

१) ज्या किंमतींत आपण इंधन खरेदी करतो त्यामध्ये ४८ टक्के रक्कम हि बेस प्राईझ असते

२) त्यानंतर यावर ३५ टक्के एक्साइज ड्यूटी, १५ टक्के सेल्स टॅक्स आणि दोन टक्के कस्टम ड्यूटीचा समावेश असतो.

बेस प्राईझ म्हणजे काय
तेलाच्या बेस प्राईझमध्ये कच्च्या तेलाची किंमत, प्रक्रिया शुल्क आणि तेल शुद्ध करणाऱ्या कंपन्यांचा चार्जचा समावेश असतो. पेट्रोलचा समावेश जिएसटी मध्ये करण्यात आला नसल्याने केंद्र सरकार यावर एक्साइज ड्यूटी लावते आणि राज्य सरकार यावर वॅट वसूल करते.

आरोग्यविषयक बातम्या

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय