प्रत्येक पेट्रोल पंपवर ‘या’ सुविधा मोफत असतात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात ग्राहकांंना पेट्रोल पंपवर काही मोफत सुविधा पुरवण्यात येतात. पेट्रोल पंप चालकांकडून ग्राहकांना या मोफत सुविधा पुरवणे आवश्यक असते. मार्केटिंग अनुशासनअंतर्गत येणाऱ्या या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या पेट्रोल पंप चालकावर कारवाई होऊ शकते. याशिवाय पेट्रोल पंप चालकाचा पेट्रोल विक्रीचा परवाना रद्द करण्यात येऊ शकतो.

या सुविधा ग्राहकांना मोफत देणे आवश्यक –

१. पेट्रोल पंप चालकांना वाहन चालकांसाठी हवा भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करुन द्यायची असते, म्हणून पेट्रोल पंपवर हवा भरण्यासाठी मशिन बसवणे आवश्यक असते. या कामासाठी एका व्यक्तीची नियुक्ती देखील करणे आवश्यक असते.
२. पिण्याच्या पाण्याची सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक असते. यासाठी पेट्रोल पंपवर आरो किंवा वॉटर पुरिफायर बसवणे आवश्यक असून ही सेवा ग्राहकांना मोफत द्यावी लागते.
३. शौचालयाची सुविधा पेट्रोल पंपावर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहकांकडून पैसे घेण्यात येऊ नये. शौचालय अस्वच्छ असल्यास त्याची तक्रार ग्राहक करु शकतात.
४. ग्राहकांना मोफत कॉलची सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. लोकांना या सेवेची कल्पना नसते. परंतू आपत्कालीन परिस्थिती आल्यास तुम्ही पेट्रोल पंपावरुन कॉल करु शकतात.
५. पेट्रोल पंपवर फर्स्ट एड बॉक्स असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे जर एक्सापायरी डेट असलेली औषधे ठेवणे हा गुन्हा आहे.
६. फायर सेफ्टी डिवायस आणि रेती भरलेली बादली असणे आवश्यक आहे. ज्याचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करु शकतात.
७. पेट्रोल पंप वर इंधन भरल्यावर बिल मागण्याचा आधिकार ग्राहकांला आहे. त्यामुळे ग्राहक पेट्रोल पंप मालकाकडून बिल मागू शकतात. याशिवाय इंधनाची क्वालिटी आणि कॉन्टिटी काय हे जाणून घेण्याचा आधिकार ग्राहकाला आहे.
८. पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची माहिती ग्राहकांना देणे आवश्यक आहे. याशिवाय पेट्रोलपंप मालक आणि पेट्रोलियम कंपनीचे नाव आणि संपर्क क्रमांक डिस्प्ले करणे अनिवार्य आहे.
९. पेट्रोल पंपवर तक्रार पेटी ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरुन ग्राहक आपली तक्रार देऊ शकतील.
१०. पेट्रोल पंपवर इंधन आहे की नाही यांच्या माहितीचे फलक लावणे आवश्यक आहे.
.

या सुविधा उपलब्ध नसेल तर कुठे करु शकतात तक्रार –

या सुविधा पेट्रोल पंपवर उपलब्ध करण्यात येत नसतील किंवा त्या सुविधांवर पैसे आकारण्यात येत नसतील. तर यासाठी सेन्ट्रलाईज्ड पब्लिक ग्रीवेंसरिड्रेस अॅण्ड मॉनिटरिंग सिस्टीमच्या पोर्टलवर (pfportal.gov) तक्रार दाखल करु शकतात. जा कंपनीचे पेट्रोल पंप आहे. त्यांच्याकडे देखील ही तक्रार दाखल करता येते. याशिवाय पेट्रोल कंपनीच्या वेबसाईटवर ई मेलद्वारे आणि संपर्कात क्रमांकवर दाखल करता येईल.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी