PFRDA | पेन्शनधारकांसाठी खुशखबर ! NPS मधून सर्व पैसे काढू शकणार सबस्क्रायबर्स; PFRDA ने दिली मंजूरी, जाणून घ्या नवीन नियम आणि अटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सबस्क्रायबर्सला आपले पूर्ण पैसे काढण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. PFRDA ने म्हटले की ते सबस्क्रायबर्स ज्यांची एकुण पेन्शन कॉर्पस 5 लाख रुपये किंवा यापेक्षा कमी आहे, ते विना एन्युटी खरेदी करता पूर्ण पैसे काढू शकतात.

NPS मधून काढू शकता पूर्ण पैसे
पेन्शन रेग्युलेटर PFRDA नुसार, ज्या सबस्क्रायबर्सचे परर्मनंट रिटायर्मेंट अकाऊंटमध्ये जमलेली पेन्शन रक्कम 5 लाख रुपये किंवा यापेक्षा कमी आहे किंवा प्राधिकरणाच्या ठरलेल्या सीमेनुसार आहे, अशा सबस्क्रायबर्सजवळ विना एन्यूटी खरेदी करता पूर्ण पेन्शन रक्कम काढण्याचा पर्याय असेल. येथे एन्यूटी खरेदी करण्याचा अर्थ इन्श्युरन्स कंपन्यांकडून पेन्शन प्लॅन खरेदी करण्याशी आहे.

जुने नियम

सध्या जर NPS सबस्क्रायबर्स ज्यांचा एकुण कॉर्पस 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, रिटायर्मेंटच्या वेळी किंवा 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना इश्युरन्स कंपन्यांकडून एन्युटी खरेदी आवश्यक असते. सबस्क्रायबर्स आपले 60 टक्के पैसे एकरकमी काढू शकतात, परंतु उर्वरित 40 टक्के पैशातून एन्युटी खरेदी करणे अनिवार्य आहे.

एनपीएस सबस्क्रायबर्स तीन वर्षानंतरच आपल्या अकाऊंटमधून पैसे काढू शकतात,
परंतु यासाठी काही अटी ठरलेल्या आहेत.
मॅच्युरिटीच्या अगोदर पैसे काढल्यास ही रक्कम एकुण योगदानाच्या 25 टक्केपेक्षा जास्त होऊ शकत नाही.
हे अंशता पैसे काढणे मुलांचे शिक्षण, मुलांचा विवाह, घर खरेदी किंवा एखाद्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी केले जाऊ शकते.
एनपीएस सबस्क्रायबर्स पूर्ण कालावधी दरम्यान तीनवेळा अशाप्रकारे अंशता पैसे काढू शकतो.
हे काढलेले पैसे इन्कम टॅक्स नियमांतर्गत टॅक्स फ्री आहे.

Web Titel :- PFRDA | nps rule changed nps subscribers withdraw full pension corpus of rs 5 lakh without buying annuity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

NPS New Rules | सरकारच्या ‘या’ स्कीममधून तुम्हाला मिळेल 5 लाख रूपयापर्यंतची रक्कम, जाणून घ्या काय आहे नवीन नियम?