Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना महामारीचे संकट आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात (Corona pandemic) परदेशात प्रवास (Foreign Travel) करणे खूपच कठीण झाले आहे. अनेक देशांनी आपल्या देशामध्ये पर्यटक (Tourist) आणि परदेशी नागरिकांना बंदी घातली आहे. तर काही देशांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतले असणे बंधनकारक केले आहे. जर तुम्हाला परदेशात प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला तुमचे व्हॅक्सीन सर्टिफिकेट तुमच्या पासपोर्टला लिंक करणे आवश्यक (Linking Vaccine certificate to Passport) आहे. यासाठी CoWIN पोर्टलने एक पर्याय उपलब्ध करुन दिला. याद्वारे तुम्ही तुमचे व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टसोबत लिंक करु (Linking Vaccine certificate to Passport) शकता.

NPS New Rules | सरकारच्या ‘या’ स्कीममधून तुम्हाला मिळेल 5 लाख रूपयापर्यंतची रक्कम, जाणून घ्या काय आहे नवीन नियम?

कोरोना व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टसोबत लिंक करताना अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असलेल, की मी रजिस्ट्रेशन करताना ओळखपत्र म्हणून पासपोर्ट दिलेला नाही. तर मग माझे व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टसोबत लिंक कसे करायचे ? पासपोर्ट वरील नाव आणि सर्टिफिकेटवरील नाव यामध्ये बदल आहे, मग काय करायचे ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. तसेच व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टसोबत कसे लिंक करायचे ते देखील जाणून घ्या. How to link Passport to Vaccine certificate?

Mumbai Rains | मुंबईकरांसाठी काळरात्र ! पावसामुळे 25 जणांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख तर मोदी सरकारकडून 2 लाखाची मदत जाहीर

प्रश्न – माझ्या पासपोर्टवरील नाव आणि सर्टिफिकेटवरील नाव वेगळे आहे. यामुळे मला काही अडचण येऊ शकते का ?

उत्तर – हो, तुमच्या पासपोर्टवरील नाव आणि व्हॅक्सीन सर्टिफिकेटवरील नाव एकच असले पाहिजे. जर सर्टिफिकेटवरील नाव बदलले असेल तर तुम्हाला CoWIN वेबसाईटवर जाऊन नाव बदलता येऊ शकते.

प्रश्न – कोविनवर नोंदणी करताना ओळखपत्र म्हणून पासपोर्ट दिले नाही. मी नंतर लिंक करु शकतो का ?

उत्तर – कोविनवर नोंदणी करताना जर तुम्ही दुसरे कोणतेही ओळखपत्र दिले असले तरी तुम्ही तुमच्या पासपोर्टला व्हॅक्सीन सर्टिफिकेट लिंक करु शकता.

प्रश्न – मला व्हॅक्सीन सर्टिफिकेटवरील नाव बदलायचे आहे, कसे बदलायचे ?

उत्तर- तुमच्या व्हॅक्सीन सर्टिफिकेटवरील नाव बदलले असेल तर ते तुम्हाला बदलता येते. परंतु फक्त एकदाच बदल करु शकता. त्यामुळे नावातील चूक दुरुस्त करताना खातरजमा करुन घ्यावी की नाव योग्य आहे की नाही.

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक

नाव बदलण्याची पद्धत

– यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करुन साइन इन करा.

– त्यानंतर ‘रेंज ऑन इश्यू’ वर क्लिक करा.

– ड्रॉपडाऊन मेनूवरुन ‘सर्टिफिकेट करेक्शन’चा पर्याय निवडा

– ज्याचे नाव बदलायचे किंवा दुरुस्त करायचे आहे त्याचे नाव निवडा

– ‘समस्या क्या है ?’ या पर्यायाअंतर्गत ‘प्रमाणपत्र मे सुधार’ हा पर्याय निवडावा.

– त्यानंतर तुम्हाला नाव, लिंग, जन्मतारीख आणि फोटो आयडी नंबर यामधील दोन पर्याय निवडावे लागतील.

– तिथे ‘नाव’ निवडा आणि ‘कंटीन्यू’ वर क्लिक करा.

– आवश्यक ती दुरुस्ती करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.

प्रश्न – कोविन वेबसाईटच्या मध्यमातून माझा पासपोर्ट व्हॅक्सीन सर्टिफिकेटला कसे लिंक करु ?

उत्तर –

– तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा उपयोग करुन साईन इन करा.

– ‘अकाउंट डिटेल्स’ पेजवर ‘रेज अॅन इश्यू’वर क्लिक करा.

– ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये ‘पासपोर्ट विवरण जोडे’ निवडा.

– त्या सदस्याला निवडा ज्याचा पासपोर्ट तुम्हाला लिंक करायचा आहे.

– त्यानंतर पासपोर्ट नंबर टाका.

– त्या बॉक्सला चेक करा ज्या म्हटेल आहे की ‘मै घोषणा करता हूं कि यह पासपोर्ट लाभार्थी का है | पासपोर्ट धारक का नाव वही है जो टीके के प्रमाण पत्र में लिखा है |’

– ‘सबमिट रिक्वेस्ट’वर क्लिक करा.

– एक वेळ असे केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज येईल.

– त्यानंतर काही सेकंदानी तुम्हाला आणखी एक मेसेज येईल. यामध्ये म्हटले असेल की तुमची विनंती यशस्वीरित्या अपडेट करण्यात आली आहे.

प्रश्न – मला पुन्हा सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची आवश्यकता आहे का ?

उत्तर – आपल्या ‘अकाउंट डिटेल्स’ पेजवर परत जा आणि जो लाभार्थी तुम्ही लिंक केला आहे त्याच्या अंतर्गत ‘प्रमाणपत्र’वर क्लिक करा. आता तुम्ही आपल्या पासपोर्टशी लिंक करण्यात आलेले अपडेटेड सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकता.

प्रश्न – मी अद्याप कोविनवर रजिस्ट्रेशन केले नाही. नोंदणी करताना ओळखपत्र म्हणून पासपोर्ट देऊ शकतो का ?

उत्तर – हो तुम्ही तुमच्या पासपोर्टचा वापर ओळखपत्र म्हणून करु शकता. नोंदणी करताना पर्याय दिले जातात.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Linking Vaccine certificate to Passport | passport how to link passport to vaccine certificate easy procedure to follow know about that

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update