टक्कल पडलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा जास्त धोका, 2.5 पट जास्त गंभीर प्रकारे पीडित होण्याची भीती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीचा कहर भारतात वाढत चालला असून स्थिती चिंताजनक आहे. याच दरम्यान नवीन रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, टक्कल पडलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याच्या बाबतीत गंभीर प्रकारे आजारी होण्याचा धोका खुप जास्त आहे.

एक्सपर्टनुसार, ज्या पुरुषांमध्ये मेल हार्मोन सेन्सिटिव्हिटी लेव्हल 22 पेक्षा जास्त आहे, ते सामान्य लोकांच्या तुलनेत गंभीर प्रकारे 2.5 पट जास्त आजारी होऊ शकतात. या रिसर्चमध्ये 65 लोकांना सहभागी करण्यात आले, ज्यांचे अनुवंशिक प्रकारे टक्क्ल पडलेले होते.

डेलीमेलच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांनुसार या लोकांची अनुवंशिकता आणि डीएनए सॅम्पलिंग सुद्धा करण्यात आले. या दरम्यान पुरुषांच्या टक्कलाचा पॅटर्न सुद्धा तपासण्यात आला. यास अँड्रॉजेनिटीक अलोपेसीया सुद्धा म्हणतात. यामुळे जगातील 50 टक्के पुरुष, जे 50 वर्षाच्या वरील आहेत, त्यांना टक्कल पडण्याची समस्या होते.

नवी रिसर्च कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी नवीन दरवाजे उघडू शकतो. कोरोनावर संशोधन करत असलेल्या टीमचे म्हणणे आहे की, या पॅटर्ननुसार, जर उपचार केला गेला तर शक्य आहे की, कोरोनाचा परिणाम कमी केला जाऊ शकतो.

पुरुषांच्या टक्कलाला एंड्रोजेन रिसेप्टर (एआर) कंट्रोल करतात. यावरूनच समजते की एखाद्या व्यक्तीचे शरीर एंड्रोजेन्सबाबत किती सेन्सिटिव्ह आहे. एंड्रोजेन्स टीएमपीआरएसएस2 एंजाइमशी सुद्धा संबंधीत आहे. जे कोरोना व्हायरस संसर्गाच्या बाबतीत महत्वाची भूमिका पार पडते.