सेल्फीसाठी असे पराक्रम करते ही मुलगी, पाहणारे होतात थक्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात एकापेक्षा एक हौशी लोक आहेत. कोणाला ड्रायविंगचा शौक असतो तर काहींना पार्टी, डान्स आणि प्रवासाचा. परंतु रशियातील एका मुलीला अनोखा शौक आहे, ज्याच्यासाठी ती आपला जीव धोक्यात घालते. रशियाची रहिवासी असलेल्या अँजेला निकोलोला फोटो काढण्याची फार आवड आहे, परंतु हे सामान्य फोटो नाहीत. तर अँजेलाला जगातील उंचच्या – उंच इमारतींवर फोटो काढण्याची आवड आहे.

अशाप्रकारे, उंच इमारतींच्या टॉपवर चढून फोटो काढणे याला रूफटॉपिंग असे म्हणतात. अँजेला निकोलोला रूफटॉपिंगची खूप आवड आहे आणि त्यासाठी तिला आपल्या जिवाचीही पर्वा नाही. फोटो उत्साही अँजेला निककोलोच्या या कृत्यांमुळे लोकांचा श्वास थांबतो. बऱ्याच वेळा तिला फोटो काढताना पाहून लोक ओरडायला सुरुवात करतात. पण अँजेलाला काही फरक पडत नाही. उलट उंचावर फोटो काढण्याचा तिला छंद दिवसेंदिवस वाढत आहे.

रूफटॉपिंग हा आता जगभरातील ट्रेंड बनला आहे. महत्त्वाचे म्हणजे रूफटॉपिंगच्या नादात लोकांचा जीव धोक्यात येतो. अश्या अनेक घटनांत लोकांना त्यांचे प्राण गमावले लागले आहे. वास्तविक अँजेला सर्कसशी संबंधित असून तिला स्टंट्स करण्यास खूप आवडते. असे करताना तिला अजिबात भीती वाटत नाही. विशेष म्हणजे अँजेलाला तिच्या वडिलांनी लहानपणापासूनच असे काम करण्यासाठी ट्रेनिंग दिली आहे.