‘फोटोग्राफर’ डब्बू रतनानीनं क्लिक केला कंगनाचा ‘असा’ बोल्ड फोटो ! सोशलवर झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील अनेक अॅक्ट्रेस प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट करत असतात. त्याला सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डब्बू प्रत्येक वर्षी आपल्या फोटोशुटमध्ये कोणत्या ना कोणत्या अॅक्ट्रेसला न्यूड किंवा टॉपलेस करतच असतो ज्यामुळं तो चर्चेत येत असतो. नुकताच डब्बूनं अभिनेत्री कंगना रणौत हिचा एक फोटो शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे.

डब्बूनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोत कंगना रणौत दिसत आहे. फोटो ब्लॅक अँड व्हाईट असला तरी त्यात कंगना खूपच बोल्ड दिसत आहे. कंगनानं जो ड्रेस घातला आणि जी पोज दिली आहे त्यात ती आणखीच हॉट दिसत आहे. सध्या या फोटोची खूप चर्चा होताना दिसत आहे.

डब्बूनं शेअर केलेला कंगनाचा हा फोटो चाहत्यांनाही खूप आडवला आहे. अनेकांनी कमेंट कंगनाच्या या हॉट लुकचं कौतुक केलं आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/B2vylC3hQVM/

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CAXtehwKcZU/

https://www.instagram.com/p/CANK4Z0nynN/

https://www.instagram.com/p/B_y5b6VpHyW/

https://www.instagram.com/p/B-FacZ9JlRs/

https://www.instagram.com/p/B-FaVXqJi8n/

https://www.instagram.com/p/B-FaVXqJi8n/

https://www.instagram.com/p/B-tYHQJjbL5/