अभिनेत्री हिना खान आणि तिच्या बॉयफ्रेंडचे ‘इंटिमेट’ फोटो व्हायरल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अ‍ॅक्टरेस हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल या दिवसांमध्ये चर्चेत आले आहेत. दोघांची लव स्टोरी खूप सुंदर आहे. हीनाची ओळख बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल सोबत ये रिश्ता क्या कहलाता है च्या सेट वर झाली होती, रॉकी शो चा निर्माता होता. सेटवरतीच दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. हिना आणि रॉकी यांच्या वैयक्तिक संबंधासह व्यावसायिक संबंध देखील खूप चांगले आहेत. हिना नेहमी सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो शेयर करत असते.

नुकतेच रॉकीने आपल्या सोशल मीडियावर हिना सोबतचे इंटिमेट फोटो शेयर केले आहेत. या फोटो मध्ये दोघे सनग्लास लावून सेल्फी काढतांना दिसता आहेत. हिनाने रॉकीच्या गळ्यात हात टाकला आहे. रॉकीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हा फोटो हिना खानच्या विश लिस्ट या आगामी चित्रपटाच्या शुटींग शेड्युल दरम्यानचा आहे.चाहत्यांना रॉकी आणि हिनाचे रोमँटिक फोटो खूप आवडले आहेत. काही दिवसांपूर्वी हिना कांस फिल्म फेस्टिवलमध्ये देखील दिसून आली होती. बॉलीवूड रिपोर्टनुसार, हिना युरोपमध्ये विश लिस्ट चित्रपटाची शुटिंग करते आहे. हिनाने काही दिवसांपूर्वीच टीव्ही शो कसौटी जिंदगी की २ ला अलविदा केले होते.

आरोग्य विषयक वृत्त –

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

अशुद्ध रक्ताने भेडसावते पिंपल्स आणि थकव्याची समस्या

फूड पॉयझनिंगवर ‘हे’ आहेत साधेसोपे रामबाण उपाय

बडीशेपचे पाणी प्या, उन्हापासून सहज हाईल बचाव