Piles | मुळव्याधच्या शत्रू या २ वस्तू, रोज करा सेवन, काही दिवसातच मिळेल दिलासा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

नवी दिल्ली : Piles | चुकीचे खाणे-पिणे आणि चुकीची जीवनशैली अनेक आजारांना कारणीभूत ठरत आहे. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या. अशा समस्यांमध्ये मूळव्याधचा समावेश होतो. बाजारातील औषधांचा याच्यावर काहीच परिणाम होत नाही. परंतु, लिंबू आणि दुध ही समस्या कमी करण्यासाठी मदत करू शकते. याबाबत लखनौच्या बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ. जितेंद्र शर्मा यांनी एका वेबसाईटला दिलेली माहिती जाणून घेऊया (Benefits of Milk And Lemon For Piles)…

मुळव्याधमध्ये लिंबू कसे फायदेशीर?
लिंबू आणि दुधाचे सेवन मूळव्याधसाठी खूप गुणकारी मानले जाते. मूळव्याधग्रस्तांना (Piles) मल जाण्यास खूप त्रास होतो. अशावेळी लिंबू सेवन केल्याने आतड्याची समस्या कमी होते. यासोबतच लिंबाच्या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे गुदद्वारातील सूज आणि वेदना कमी होतात. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून मल पास करताना अडचण येऊ नये.

मुळव्याधमध्ये दूध किती फायदेशीर?
मुळव्याधची समस्या असल्यास दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू टाळाव्या.
कारण दूध किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते.
मात्र, मूळव्याध पासून आराम मिळविण्यासाठी थंड दूध, दही, केफिर आणि कच्चे दूध घेऊ शकता.
त्याच्या सेवनाने हानी होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

दूध आणि लिंबू सेवन करण्याची पद्धत
मुळव्याधची समस्या टाळण्यासाठी दूध आणि लिंबाचा वापर करणे खूप सोपे आहे. या दोन्ही गोष्टी सकाळी रिकाम्या
पोटी सेवन कराव्यात. लिंबाचा रस आणि दुधाचे सेवन करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास थंड पाण्यात एक
लिंबू पिळून घ्या. यानंतर हे मिश्रण सेवन करा. असे केल्याने मुळव्याधची समस्या दूर होण्यास मदत होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरुन रोहित पवारांनी साधला निशाणा, तर विद्यार्थी संघटनेकडून संताप

Sambhaji Bhide Meets Manoj Jarange Patil | संभाजी भिडे यांनी काढली उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची समजूत; म्हणाले, “ते राजकारणी आहेत म्हणून…”

ST Employees Strike in Maharashtra | उद्योगमंत्री उदय सामंतांकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन, आझाद मैदानावरील एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे