Rohit Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावरुन रोहित पवारांनी साधला निशाणा, तर विद्यार्थी संघटनेकडून संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar On Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु अनेकदा त्यांचे वक्तव्य त्यांच्यावरच उलटलेले आहेत. अजित पवार यांनी नुकतेच केलेल्या एका विधानामुळे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar On Ajit Pawar) यांनी निशाणा साधाला आहे. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारविषयी चीड निर्माण झाली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत शासकीय नोकर भरतीला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार या त्रिकुटाला पुढच्या निवडणुकीत घरी बसवा, असे आव्हान केले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरकडे जात होते. त्यावेळी त्यांना डेमोक्रेटिक पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या निवेदनात शासकीय नोकरभरती (Government Recruitment) खासगी कंपनीऐवजी शासनामार्फत करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनावर मोठा खर्च होते. एका शासकीय कर्मचार्‍याच्या पगारात खासगी कंपनीचे तीन कर्मचारी काम करतात. राज्याचे वार्षिक बजेट साडेपाच ते सहा लाख कोटींचे आहे. या अर्थसंकल्पापैकी 2 लाख 40 हजार कोटींचा खर्च केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

रोहित पवारांनी साधला निशाणा

एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी (Contract Staff) काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील. (Rohit Pawar On Ajit Pawar)

बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर 150 कोटी खर्चासाठी, शासन आपल्या दारीच्या एकेका सभेसाठी 8-10 कोटी व त्याच्या जाहिरातीवर 52 कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते. मग नोकर भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न
घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज कंत्राटी भरतीसाठी जीआर काढत आहेत.
केंद्र सरकार (Central Government) प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे.
सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच (State Govt) कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या,
अशा शब्दात रोहित पवारांनी अजित पवार यांचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

‘हुजूर, आम्ही मजूर बनायला तयार नाहीत’

अजित पवार यांच्या विधानावर बोलताना स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया
(Students’ Rights Association of India) चे उमेश कोर्राम म्हणाले, आत्ता कुठे आम्ही हुजुरांसोबत चर्चेला सुरुवात
केली आहे. वेठबिगारी रद्द झालेली आहे. अजित पवार यांचे वित्तमंत्र्याचे काम एखाद्या खासगी एजन्सीला द्यावे.
कारण, त्यांचा ताफा, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांवर होणारा खर्च जास्त आहे.
या खर्चात वित्त मंत्री आणि इतर 4 मंत्र्यांचा खर्च पूर्ण करता येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे