Sambhaji Bhide Meets Manoj Jarange Patil | संभाजी भिडे यांनी काढली उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची समजूत; म्हणाले, “ते राजकारणी आहेत म्हणून…”

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhaji Bhide Meets Manoj Jarange Patil | जालन्यामधील अंतरवाली सराटी येथे मागील 15 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणकर्ते मनोज जरांगे हे उपोषणावर बसले आहेत. सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल (दि.11) मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये देखील मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र जरांगे हे उपोषण मागे न घेण्यावर ठाम आहेत. दरम्यान आज जालन्यामधील उपोषणस्थळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट(Sambhaji Bhide Meets Manoj Jarange Patil) घेतली आहे. संभाजी भिडे यांनी देखील मनोज जरांगे यांना तुमची मागणी बरोबर असली तरी आता उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले आहे. तसेच सरकारकडून आश्वासनाची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, असेही संभाजी भिडे यांनी जरांगे पाटलांना सांगितले आहे.

राज्य सरकारकडून (State Government) मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती सातत्याने केली जात आहे. उपोषणकर्त्यांची समजूत घालण्यासाठी आणि राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) व अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे चर्चेसाठी उपोषणस्थळी आले होते. याचवेळी संभाजी भिडे देखील तिथे उपस्थित राहिले. संभाजी भिडे यांनी देखील उपोषण मागे घेण्याची विनंती जरांगे यांना केली आहे. “मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही, असा मूर्ख माणूस म्हणजे मी. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहोत. मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. मागे वळून तुम्ही बघायचंच नाही की आपल्या पाठिशी कोण आहे”, असे संभाजी भिडे यावेळी जरांगे यांना सांगितले.

संभाजी भिडे यांनी राज्य सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर विश्वास ठेवावा असे देखील जरांगे यांना सांगितले. भिडे म्हणाले की, तुम्ही जे करताय ते योग्य आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करत नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे (NCP) असले, तरी काळजी करणारा माणूस आहे. माझं असं मत आहे की आपण हे आंदोलन जिवाच्या आकांतानं तुम्ही चालवत आहात. तुमच्या तपश्चर्येला यश मिळणार. उगीच ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. आणि ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे लागलं’ अशा शब्दांमध्ये संभाजी भिडे यांनी जरांगे यांना आश्वस्त केले आहे. (Sambhaji Bhide Meets Manoj Jarange Patil)

पुढे संभाजी भिडे म्हणाले की, “ही लढाई आहे. झट की पट एक घाव दोन तुकडे अशी नाही.
पण तुमच्या बाजूने ही लढाई यशस्वी होणार आहे. पण तुम्ही हे उपोषण थांबवावं.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही आमचे प्रमुख आहात.
मराठा समाज हिंदुस्थानच्या पाठिचा कणा आहे. तु्म्ही उपोषण थांबवा, लढा नाही.
काल रात्री 12.40 ला मला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण जाऊ सांगुयात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत”
असा संवाद संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत साधला. उपोषण आता सोडावे. लढाई मात्र सुरु राहणार आहे.
मराठा आरक्षणाच्या शेवटपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे देखील संभाजी भिडे म्हणाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Low Cost Fruit And Vegetables Benefits | सर्व प्रकारच्या रोगांचे शत्रू आहेत ‘ही’
5 स्वस्त कलरफुल फळे आणि भाज्या, आराग्यात ताजेपणा येण्यासाठी रोज खा

Why Do Women Have More Sleep Problems | महिलांना सर्वात जास्त का होते झोपेची समस्या?
जाणून घ्या 3 मोठी कारणे, ‘स्‍लीप डिसऑर्डर’ची ही लक्षणे