पिंपरी : वेगवेगळ्या गुन्ह्यातील ९ आरोपीकडून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपीर : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत १४ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. यात ११ तोळे सोन्याचे दागिने,२३ मोबाईल, दोन देशी बनावटीचे पिस्तुल,तीन जिवंत काडतुसे,तीन चारचाकी गाड्या आणि एक मोटार सायकल असा ऐकूण १४ लाख रुपयांचा ऐवज पिंपरी पोलिसांनी हस्तगत केला आहे. वेगवेगळ्या केलेल्या कारवाई नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

सुरजितसिंग राजपालसिंग टाक, हर्षल गुलाब पवार, महेश शिवदास दिक्से, सैम्युअल उर्फ विशाल डेडली ओरनॉल्ड, अतुल कुमार अविनाश पवार, सागर कुमार  इंद्रा, राहुल श्रीहरि, अक्षय आबासाहेब कोळेकर आणि शुभम नितिन काळभोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शहरात नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत असताना पिंपरी पोलिसांना खबरीमार्फत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी सापळा रचत वेगवेगळ्या ठिकाणाहून नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. यामधील सुरजितसिंग टाक या आरोपिकडून ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर अन्य आरोपींकडून घरफोडी , २ देशी पिस्टल, ३ जिवंत काडतुस, ११ तोळे सोन आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम, २३ मोबाईल, २ सेन्ट्रो कार, १ स्विफ्ट कार आणि १ दुचाकी असा एकूण १४ लाख ७ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलिस उप निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, हरिदास बोचरे, दत्तात्रय नणनवरे, शाकिर जेनिडी, राजेन्द्र भोसले, नागनाथ लकड़े, महादेव जावळे,जावेद पठान, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, प्रवीण वाजे, दादा धस नीलेश जगताप, उमेश वानखेड़े, रोहित पिंजरकर, नितिन सूर्यवंशी, अविनाश देशमुख, संतोष भालेराव, शैलेश मगर, सुहास डंगारे, स्वप्निल झनकर, नामदेव पोटकुले, शिवा भोपे, सोनवणे, म्हेत्रे, विकास रेड्डी, विद्यासागर भोते, सुषमा पाटिल यांच्या टीम ने केली आहे.