Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : नामांकित फायनान्स कंपनीच्या नावाने साडेचार लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेअर मार्केट (Share Market) आणि इतर फायनान्सियल सेवा क्षेत्रात नामांकीत असलेल्या मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल लि. कंपनीच्या (Motilal Oswal Financial Ltd. Company) नावाने एका महिलेला साडेचार लाखांचा गंडा घातला. शेअर खरेदी करण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन नतंर फोन घेणं बंद करुन आर्थिक फसवणूक (Pimpri Cheating Fraud Case) केली. हा प्रकार 12 जानेवारी ते 14 एप्रिल या कालावधीत पिंपळे निलख येथे घडला.(Pimpri Cheating Fraud Case)

याप्रकरणी प्रमोद गायकवाड (रा. ठाणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशालनगर परिसरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद याने फिर्यादी महिलेला तो मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल लि.
या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. महिलेसोबत वर्षभर बोलणी करून त्यांचा विश्वास संपादन केला.
कंपनीचे अनलिस्टेड 6 हजार 360 शेअर्स पाच लाख रुपयांना विकत घेण्याचा सल्ला प्रमोदने फिर्यादी महिलेला दिला. महिलेने ते शेअर खरेदी करण्यासाठी तयारी दर्शवली. प्रमोद याने मोतीलाल ओसवाल कंपनीसोबत मोरेश्वर कार्पोरेशन कंपनी टायअप असल्याचे भासवले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून मोरेश्वर कार्पोरेशन कंपनीच्या बँक खात्यावर पैसे घेतले.

त्यानंतर महिलेला कोणतेही शेअर दिले नाहीत. त्यामुळे महिलेने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्याला सांगितले.
त्यावेळी प्रमोद याने महिलेला 50 हजार रुपये दिले.
त्यानंतर प्रमोद याने त्यांचे फोन घेणं बंद करुन उर्वरित साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cheating Fraud Case Pune | पुणे : आयटी अभियंता तरुणीला 14 लाखांचा गंडा, स्काईप आयडीवरून अंगावरील तीळ दाखवण्यास भाग पाडले

Shirur Lok Sabha | आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण

Amol Kolhe On Ajit Pawar | पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला

BJP MLA Mangesh Chavan | भाजपा आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, ”मंत्रालयातील तिजोरीचा चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा…”, फडणवीसांचाही उल्लेख

Pune News | केएसबी पंप ने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी केली लॉन्च